Mumbai Indians IPL 2023 Playoffs Qualification Race How Much Has The Defeat To LSG Affected Mumbai Indians Chances 2023 Ipl Live Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai Indians, IPL 2023 : इकाना स्टेडिअमवर रोमांचक सामन्यात लखनौने मुंबईचा अवघ्या पाच धावांनी पराभूत केले. हा पराभव मुंबईच्या जिव्हारी लागणार आहे. कारण, या पराभवामुळे मुंबईचे क्वालिफायर-1 खेळण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. त्याशिवाय प्लेऑमधील स्थानही धोक्यात आले आहे. मुंबईचा संघ सध्या गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहे… तरीही मुंबईचे प्लेऑफधील आव्हान खडतर झालेय.. 

मुंबई इंडियन्स संघाने 13 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. तर सहा सामन्यात पराभवाचा सामना केलाय. मुंबईचा रनरटेही खूप खराब आहे. मुंबईचा नेटरनरेट -0.128 इतका आहे.  प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी अखेरचा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागेल. मुंबईचा अखेरचा सामना हैदराबादविरोधात 21 मे रोजी होणार आहे. या सामन्यात मुंबईला मोठ्या फरकारने विजय मिळवून नेटरनरेट सुधारावा लागेल. 

लखनौ विरुद्धच्या सामन्यातील पराभवामुळे मुंबई इंडियन्सचं नुकसान नक्कीच झालंय. पण, त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे, प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी अजुनही संघाकडे आहे. मुंबईचा संघ 13 सामन्यांनंतर 14 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. आता जर मुंबईला त्यांच्या शेवटच्या साखळी सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं तर मात्र यंदा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचं मुंबईचं स्वप्न अधुरंच राहिल. 

गुजरातचा संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. तर दिल्ली आणि हैदराबादचे आव्हान संपले आहे. कोलकाता आणि राजस्थान यांचे आव्हान इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून आहे. चेन्नई, लखनौ, मुंबई, आरसीबी आणि पंजाब या पाच संघांपैकी तीन संघ प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. आरसीबीचा नेटरनरेट मुंबई आणि पंजाबपेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे चेन्नई आणि लखनौ या संघाचे प्रत्येकी 15 – 15 गुण आहेत. त्यांना प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी उर्वरित सामने जिंकावे लागतील. अन्यथा इतर  संघाच्या कामगिरीवर अवलंबून राहावे लागते.

मुंबई इंडियन्सने उर्वरित एका सामन्यात विजय मिळवला तर एकूण 16 गुण होतील.. असे झाल्यास 16 गुणासंह प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमी होते.. नेटरनरेट चांगला असला तर 16 गुणासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचू शकते.. सध्या मुंबईचा रनरेट मायनसमध्ये आहे. त्यामुळे हैदराबादविरोधातील सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागले. मुंबईसाठी जमेची बाजू म्हणजे, अखेरचा सामना होमग्राऊंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. मुंबई इंडियन्सचा हैदराबादविरोधात पराभव झाला तर पाच वेळच्या विजेत्याचे प्लेऑफमधील आव्हान खडतर होईल. मुंबई इंडियन्सचे फक्त 14 गुण होतील.. अशात नेटरनरेट मोठी भूमिका बजावू शकते. त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही मुंबईचे प्लेऑफमधील स्थान ठरू शकते. 
 



[ad_2]

Related posts