Team India New Test Captain Shreyas Iyer Successor Of Rohit Sharma ; Team India New Captain: रोहित शर्माचा उत्तराधिकारी ठरला; BCCI लवकरच स्टार खेळाडूकडे देणार जबाबदारी

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा नुकताच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. WTC मधील या पराभवानंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असून या दौऱ्यात २ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. तर ३ वनडे आणि ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या तिनही फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. पण त्याच बरोबर त्याचा उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू आहे.

रोहित शर्मावरील वर्कलोडचा विचार करता लवकरच उत्तराधिकाऱ्याचा शोध घेतला जात आहे. बीसीसीआयकडून नव्या कर्णधाराचा शोध घेतला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आशिया कप २०२३ आणि या वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्डकपचा विचार करून रोहितला काही दौऱ्यात विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच बरोबर गेल्या काही काळात रोहितचा फॉर्म देखील चांगला नाही. अशात रोहित शर्माच्या जागी कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरचा विचार केला जात आहे.

‘क्लिन बोल्ड’चा बदला गळा दाबून घेतला; विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा फलंदाजाने जीव घेतला
दुखापतीमुळे श्रेयस सध्या संघाबाहेर आहे. पण तो संघात परत येताच एक मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. अय्यरकडे आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने दिल्ली संघाला आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचवले होते.

पहिल्याच चेंडूवर कानाखाली; WTC विजेत्या ऑस्ट्रेलियाची नशा उतरवली, बेन स्टोक्सची रिअ‍ॅक्शन व्हायरल
भारताचा स्टार सलामीवीर हिटमॅन रोहितचे करिअर आता अखेरच्या टप्प्यात आहे. वाढत्या वयामुळे त्याचा फॉर्म देखील घसरला आहे. तर २८ वर्षीय अय्यर हा कसोटी संघाचा कर्णधार म्हणून असा एकमेव पर्याय आहे जो पुढील ५ ते ७ वर्ष संघाचे नेतृत्व करू शकतो. दुखापत होण्याआधी अय्यर दमदार फॉर्ममध्ये होता.

आशिया कपमधून मिळालेला एक रुपया घेत नाही BCCI; करोडो रुपये कोणाला देते, वाचून अभिमान वाटेल
रिपोर्टनुसार संघात मधळ्या फळीतील अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांचा पर्याय म्हणून अय्यरकडे पाहिजे जात आहे. कारण ज्या क्रमांकावर अय्यर तेथे संघात चांगला खेळाडू नाही. जेव्हा अय्यरला मधल्या क्रमांत संधी मिळाली तेव्हा त्याने स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे.

अय्यरने भारतासाठी १० कसोटी, ४२ वनडे आणि ४९ टी-२० मॅच खेळल्या आहेत. कसोटीत त्याने ४४.४०च्या सरासरीने ६६६ धावा , वनडेत ४६.६०च्या सरासरीने १ हजार ६३१ तर टी-२०मध्ये १ हजार ४३ धावा केल्या आहेत.

आयपीएल ट्रॉफी घेऊन तिरुपतीच्या दर्शनाला, सीएसकेकडून खास पूजा

[ad_2]

Related posts