मुंबई, गोवा दरम्यान लक्झरी क्रूझ सेवा, फाईव्हस्टार हॉटेल्सप्रमाणे सुविधा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

आता देशातच पर्यटकांना लक्झरी क्रूझ सेवा उपलब्ध होणार आहे. आतापर्यंत देशात फक्त लहान क्रूझ चालत असत, परंतु यावर्षी नोव्हेंबरपासून 14 मजली पंचतारांकित लक्झरी क्रूझ पर्यटकांना समुद्रात घेऊन जाणार आहे.

ही सेवा ४ नोव्हेंबरपासून मुंबई, गोवा, कोची, लक्षद्वीप या मार्गांवर उपलब्ध होणार आहे. केंद्रीय जहाज व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत सोमवारी मुंबईत ही घोषणा करण्यात आली.

मुंबई पोर्ट ट्रस्टचे (बीपीटी) चेअरमन राजीव जलोटा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोस्टा क्रूझ कंपनीने देशात प्रथमच लक्झरी क्रूझ चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

आणखी अनेक कंपन्यांनी देशात क्रूझ सेवा चालविण्यात स्वारस्य दाखवले आहे. देशांतर्गत जलमार्गांवर लक्झरी क्रूझ चालवणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल.

हा प्रवास 2 ते 5 दिवसांचा असेल

2 ते 5 दिवसांसाठी क्रूझ सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असेल.

14 मजली क्रूझमध्ये पंचतारांकित हॉटेलप्रमाणेच सुविधा असतील.

दोन दिवसांच्या क्रूझ प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे 27,000 रुपये मोजावे लागतील.

पाच दिवसांसाठी 50 ते 55 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत.

1,14,000 टन वजनाच्या कोस्टा सेरेना क्रूझमध्ये 3,780 लोकांसाठी राहण्याची सोय आहे.

1500 केबिन असलेल्या क्रूझमध्ये 505 बाल्कनी, जिम स्पा, चार स्विमिंग पूल असतील.


[ad_2]

Related posts