Pune Crime News Goons Creates Ruckus In Sahakar Nagar In The Middle Of Night Cut The Cake With A Sword

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime : पुण्यातील (Pune) सहकार नगर परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यानंतर आता सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एका टोळक्याने भरचौकात गाडी आडवी लावून त्यावर तलवारीने (Sword) केक कापला आहे. बुधवारी (21 जून) मध्यरात्री ही घटना घडली. हा केक कापत असताना या टोळक्याने या ठिकाणी धिंगाणा घातला, आरडाओरडा केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिक काही काळ दहशतीच्या छायेत होते. दरम्यान सहकार नगर पोलिसांचा त्यांच्या हद्दीतील गुंडांवर वचक राहिला की नाही असा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.

पुण्यात काही दिवसांपासून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. रहिवासी वस्तीत मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फटाक्यांची आतषबाजी करुन, रस्त्याच्या मधोमध तलवारीने केक कापून वाढदिवसाचे सेलिब्रेशन साजरे केले जाते. गल्लीबोळातील कथित भाईंकडून असे प्रकार वारंवार घडतात. अशाप्रकारे वाढदिवस साजरे केले जाऊ नये यासाठी पोलिसांकडून वारंवार बजावण्यात देखील आले आहे. तरीदेखील सर्रास याकडे दुर्लक्ष केले जाते.

तलवारीने केक कापणं अंगलट

वाढदिवसाच्या सेलिब्रेशनदरम्यान तलवारीने केक कापणं इंदापूरच्या एका तरुणाच्या अंगलट आले होते. फेब्रुवारी महिन्यात ही घटना घडली होती. त्याच्यावर इंदापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तरुणाचा वाढदिवसाचा केक तलवारीने कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी संबंधिताचा शोध घेतला. त्याच्या घरात दाखल झाले. तिथे तपासणी केली असता घराच्या मागे तलवार आढळली. त्यानंतर पोलिसांनी सचिन सातव या तरुणाला अटक केली.

पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ,  30 गाड्या फोडणाऱ्यांची पोलिसांकडून धिंड

पुण्यातील तळजाई परिसरात मंगळवारी (20 जून) पहाटे 30 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. ही घटना वनशिव झोपडपट्टी परिसरात घडली. या घटनेत सहा जणांनी तोंडावर रुमाल बांधून धुडगूस घातल्याचं आढळून आलं आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या भागातील वाघमारे आणि त्याच्या टोळीने या वाहनांची तोडफोड केली. या टोळीचे तीन हत्ती चौकात आधी विरोधी टोळीसोबत भांडण झाले. त्यानंतर वाघमारे आणि त्याची टोळी पोरांनी सहकारनगर भागात गेली आणि तिथे या टोळीने आणखी वाहनांची तोडफोड केली. या टोळीने कर्वेनगर आणि सहकारनगर भागात धुमाकुळ घातला होता. सकाळी पोलिसांनी वाघमारेला पकडलं आणि त्याची धिंड काढली.

[ad_2]

Related posts