Do these 5 remedies related to turmeric on Thursday, life will change in a jiffy; Money will rain heavily

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Thursday Remedies : अनेकांना मगाईत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. हातात पैसा नसल्याने बैचन वाढते तसेच खर्च करताना हात आखडता घ्यावा लागतो. तुमची आर्थिक स्थिती बदलायची असेल तर गुरुवारी काही उपाय केले तर आर्थिक संकट दूर होईल आणि जीवनात चांगला बदल दिसून येईल. हिंदु धर्मात आठवड्याचे सातही दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात. त्याचप्रमाणे गुरुवार हा भगवान विष्णू आणि देवतांचे गुरु बृहस्पति यांना समर्पित आहे. भगवान विष्णू हे तिन्ही जगाचे नियंत्रक मानले जातात. असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर भगवान विष्णूची कृपा असते, त्याला आयुष्यात कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. 

भगवान विष्णूची कृपा असेल तर अशी व्यक्ती जीवन-मरणाच्या बंधनातून मुक्त होऊन समाजात नावलौकिक आणि कीर्ती मिळवते. ज्योतिषांच्या मते, भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी गुरुवारी उपवास करण्यासोबतच हळदीशी संबंधित काही खास उपायही करायला हवेत. असे केल्याने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळू लागते. गुरुवारी करण्याजोगे हे खास उपाय आहेत. 

हळदीशी संबंधित गुरुवारी करावेत हे उपाय 

हळदीच्या गाठींचा हार घालावा

भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी गुरुवारी हळदीच्या गाठींपासून हार बनवून गंगाजल शिंपडा. (Thursday Remedies) यानंतर तो हार काही वेळ भगवान विष्णूच्या चरणी ठेवा. मग तो हाळ गळ्यात घाला. असे केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि आर्थिक स्थिती सुधारते असे सांगितले जाते.

गुरुवारी दान केल्याचा मोठा फायदा

ज्योतिष शास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहे. तसेच हिंदु धर्मातही दानाला मोठे महत्त्व आहे. धार्मिक विद्वानांच्या मते भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाच्या गोष्टी खूप आवडतात. म्हणूनच त्याचा आशीर्वाद मिळविसाठी गुरुवारी हळद (Thursday Che Upay) आणि हरभरा डाळ दान करावी, असा सल्ला दिला जातो. असे मानले जाते की या उपायाने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघेही खूप प्रसन्न होतात आणि चांगले आशीर्वाद देतात. 

गणपतीला टिळा लावा

तुमच्या जीवनात प्रगती हवी असेल तर गुरुवारी गणपतीचे व्रत करा. नोकरी-व्यवसायात प्रगती करण्यासाठी गुरुवारी घराबाहेर पडण्यापूर्वी श्रीगणेशाला हळदीचा टिळा लावा. यानंतर तसाच टिळा आपल्या कपाळावर लावा. असे केल्याने कामात यश मिळते आणि जीवन आनंदी होते, असे  सांगितले जाते.

रखडलेले पैसे मिळण्यासाठी…

तुमचे थकीत पैसे किंवा कर्जात अडकलेल्या पैशातून सुटका मिळवण्यासाठी गुरुवारी थोडे तांदूळ घेऊन त्यावर हळदीचा रंग लावा. यानंतर लाल रंगाचे कापड घ्या आणि त्यात तांदूळ बांधा. आणि मग तो बंडल तुमच्या खिशात ठेवा. असे म्हणतात की हा उपाय केल्याने अडकलेला पैसा परत येतो. 

कुटुंबातील आर्थिक संकट दूर 

कुटुंबातील आर्थिक संकट दूर करण्यासाठी गुरुवारी भगवान विष्णू आणि गुरुची पूजा करा. यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच केळीच्या झाडाला पाणी अर्पण करावे. असे मानले जाते की हा उपाय केल्याने आर्थिक समस्या दूर होतात आणि पैशाचा ओघ सुरु होतो आणि घरात पैसा येण्यास सुरुवात होते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

 

Related posts