१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

येत्या १ जुलै शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करतील अशी माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकांच्या मनात खदखद आहे. एकेकाळी मुंबई महापालिका साडे सहा कोटी त्रुटीत होती. परंतु शिवसेनेच्या हाती महापालिका आल्यानंतर ९२ हजार कोटी ठेवीपर्यंत तिजोरी भरली. आमच्या कारभाराने त्यात भर पडली. ठेवींमधूनच कोस्टल रोड आणि जनतेच्या उपयोगी कामे, योजना महापालिका पार पाडत होती. आता बेधडकपणे महापालिकेचा पैसा वापरला जातोय. 

ते पुढे म्हणाले की, माझ्या माहितीप्रमाणे जवळपास ७-९ हजार कोटी रुपये या ठेवींमधून आतापर्यंत वापरण्यात आला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या पैशाची लूट करणाऱ्यांना त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. त्यासाठी १ जुलैला मुंबई महापालिकेवर हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या मनातील असंतोषाचे प्रतिक म्हणून हा मोर्चा असेल असंही त्यांनी म्हटलं.

दरम्यान, मुंबई महापालिकेत घोटाळा झालाय मग 1 वर्षापासून गप्प का? तुम्ही चोरी करताय, दिवसाढवळ्या करतायेत म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर मोर्चा काढतोय. यात जे जे मुंबईप्रेमी आहेत त्यांनी सहभागी व्हावे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा लुटला जातोय, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेचा कटोरा घेऊन दिल्ली दरबारी उभं करायचे हे कटकारस्थान आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिवसेनेवर केला. 


हेही वाचा

उद्धव ठाकरेंच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेत कोणतीही कपात नाही, पोलिसांचे स्पष्टीकरण

“…तर एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती,” दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा

[ad_2]

Related posts