Instagram Now Allow Users To Download The Reels With Only One Click Know In Detail News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Instagram Reels Download Feature : तरुणाईमध्ये इन्स्टाग्रामच्या रील्सची (Instagram Reels) क्रेझ मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बराच वेळ तरुणाई रील्स स्क्रोल करण्यात घालवतात. इन्स्टाग्राम (Instagram) हे आजकाल सर्वात जास्त वापरले जाणारे अॅप आहे. या अॅपच्या मदतीने लोक हजारो-लाखो रुपये कमवतात. इन्स्टाग्राम सतत नवीनवीन फीचर्स (Features) घेऊन युजर्सना आश्चर्यचकित करत असतं. आता असंच एक नवीन फीचर इन्स्टाग्रामने आणले आहे. तुम्हाला आवडणारे कोणतेही रील (Reel) तुम्ही एका क्लिकवर डाऊनलोड करता येणार आहे.

हे कसे डाऊनलोड (Download) करायचे हे जाणून घेऊया. बरेच लोक रील डाऊनलोड करण्यासाठी इतर अॅप्सचा वापर करतात. मात्र आता हे करण्याची गरज नाही. कारण कंपनीने थेट रील डाऊनलोड करण्याचा पर्याय आणला आहे. हे नवीन फीचर टिकटाॅक (Tiktok) प्रमाणेच असणार आहे. टिकटाॅकवरील व्हिडीओ डाऊनलोड करताना त्यावर वाॅटरमार्क येत होता. पण हे रील्स डाऊनलोड केल्यावर कोणताही वाॅटरमार्क येणार नाही. सध्यातरी रील्स डाऊनलोड करण्याचा पर्याय केवळ US मधील युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हळूहळू कंपनी हे फीचर सर्वांसाठी उपलब्ध करुन देणार आहे.

कसे डाऊनलोड कराल रील?

 रील्स डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला शेअर रील बटणावर क्लिक करावे लागेल.

 याठिकाणी तुम्हाला डाऊनलोड पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यास रील तुमच्या फोनच्या गॅलरीत सेव्ह होईल. 

एखाद्याचे अकाऊंट पब्लिक असल्यास तो वापरकर्ता हवं तेव्हा रील डाऊनलोड करण्याचा पर्याय काढून टाकू शकतो. त्यामुळे अशा वेळी त्याला रील डाऊनलोड करता येणार नाही. Instagram ने अलिकडे जगभरातील वापरकर्त्यांसाठी नोट्समध्ये संगीत क्लिप जोडण्याचा थेट पर्याय उपलब्ध केला आहे. यासोबतच यूजर नोट्सचे भाषांतरही करु शकतात. Instagram Notes मध्ये, वापरकर्ते जास्तीत जास्त 30 सेकंदांपर्यंत ऑडिओ क्लिप शेअर करु शकतात. कंपनीने नोट्स फीचर गेल्या वर्षी सुरु केले होते. या अंतर्गत, वापरकर्ते दिवसाचे अपडेट किंवा त्यांचे विचार 60 अक्षरांमध्ये इतरांपर्यंत पोहोचवू शकतात.

इतर महत्वच्या बातम्या

Wireless Charger : वायरलेस चार्जरने कसा चार्ज होतो तुमचा फोन, वाचा सविस्तर 

[ad_2]

Related posts