[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
India-US Space Mission 2024: भारत (India) आणि अमेरिकेने (America) 2024 मध्ये संयुक्त अंतराळ मोहिमेची ( India US Joint Space Mission) घोषणा केली आहे. व्हाईट हाऊसने गुरुवारी (22 जून) दिलेल्या माहितीनुसार, भारताने आर्टेमिस करारात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि भारताची अंतराळ संस्था इस्रो 2024 मध्ये संयुक्त आंतरराष्ट्रीय अंतराळ मोहीम सुरु करणार असल्याचं देखील व्हाईट हाऊसकडून सांगण्यात येत आहे.
आर्टेमिस अलायन्स ही नागरी अवकाश संशोधनावर समविचारी देशांना एकत्र आणण्याचे काम करते. अमेरिकेच्या एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओव्हल ऑफिसमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात होणाऱ्या बैठकीमध्ये भारत आर्टेमिस करारावर स्वाक्षरी करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अंतराळच्या विषयावर चर्चा करण्यात आली. ही संशोधन मोहीम मानवाच्या हितासाठी असणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यामध्ये होणार द्विपक्षीय बैठक
व्हाईट हाऊसमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशांतील परस्पर सहकार्य, राजकीय संबंधांना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. 2014 नंतर मोदींचा हा सहावा अमेरिका दौरा आहे. पण या दौऱ्याचं महत्व नेहमीपेक्षा अधिक आहे. यावेळी अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या आमंत्रणावरुन स्टेट व्हिजीटसाठी भारतीय पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात आलंय.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिका 2025 पर्यंत पुन्हा एकदा चंद्रावर जाणार आहे. या चांद्र मोहिमेत मंगळ आणि इतर ग्रहांपर्यंतचे संशोधन करण्यावर भर असणार आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नासा आणि इस्रो यावर्षी मानवी अंतराळ यान अवकाशात पाठवण्याची तयारी सुरु करतील. नासा आणि इस्रो हे 2024 मधील आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक मोहिमेचीदेखील तयारी करणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून अनेक विषयांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासोबत चर्चा केली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेच्या संसदेला देखील संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिकेच संबंध आणखी घनिष्ठ होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पंतप्रधानांच्या या दौऱ्यामध्ये आणखी कोणत्या महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
PM Modi US Visit : अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इलॉन मस्कसह अनेक टेक दिग्गजांची घेतली भेट, या मुद्यांवर झाली चर्चा
[ad_2]