Virender Sehwag Big Reveal About BCCI ; सेहवागने निवड समितीबाबत केला मोठा गौप्यस्फोट

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : बीसीसीआय ही जगातील सर्वात बलाढ्या आणि श्रीमंत संघटना आहे. पण या बीसीसीआयचे नाव मोठे आणि लक्षण खोटे, अशीच अवस्था असल्याचे भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या वक्तव्यानंतर समोर येत आहे. सेहवागने यावेळी भारतीय संघाच्या निवड समितीबाबत एक मोठा गोप्यस्फोट केला आहे.WTC Final नंतर भारताच्या निवड समितीचे खरे रुप सर्वांसमोर आले. जिथे भारतीय संघात शंभरपेक्षा जास्त आंतरारष्ट्रायी सामने खेळलेले खेळाडू आहेत तिथे मात्र निवड समितीमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळू न शकलेला व्यक्ती असल्याचे समोर आहे. त्याचबरोबर या निवड समितीमध्ये ५० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला एकही खेळाडू नाही. त्यामुळे निवड समितीचे खरे रुप आता सर्वांसमोर आले आहे. पण बीसीसीआयला दिग्गज खेळाडू या निवड समितीसाठी मिळत नाहीत का, असा प्रश्न विचारला जात आहे. पण भारताच्या निवड समितीमध्ये दिग्गज खेळाडू का नाहीत, याबाबतचा गौप्यस्फोट आता सेहवागने केला आहे.

सेहवाग म्हणाला की, “भारताचा संघ निवडण्यासाठी निवड समितीमध्ये नावाजलेले खेळाडू का नाही, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. पण त्याचे कारणही तसेच आहे. बीसीसीआय निवड समिती सदस्यांना यापूर्वी मानधन देत नव्हती. दिलीप वेंगसरकर यांनी तर एकही पैसा न घेता निवड समितीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यानंतर के. श्रीकांत यांच्या काळात निवड समितीला मानधन द्यायला सुरुवात झाली. सध्याच्या घडीला निवड समिती अध्यक्षांना एक कोटी तर निवड समिती सदस्यांना ९० लाख रुपये मिळतात. जर दिग्गज खेळाडूंचा विचार केला तर ते कोणत्या ना कोणत्या संघाशी किंवा चॅनेलशी जोडलेले असतात आणि तिथे त्यांना जास्त मानधन मिळते. त्यामुळे कोणतेही दिग्गज खेळाडू निवड समितीकडे वळताना दिसत नाही.” निवड समिती म्हणजे काटेरी मुकुट समजला जातो. पण तिथे काम करणाऱ्या दिग्गज व्यक्तींना भारतीय संघातील खेळाडूंपेक्षा कमी मानधन मिळते.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

बीसीसीआय जिथे खेळाडूंना ७ कोटी रुपये वर्षांसाठी देते, तिथे निवड समितीसाठी देण्यात येणारी रक्कम ही फार कमी असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे दिग्गज खेळाडू निवड समितीमध्ये सहभागी होत नाहीत.

[ad_2]

Related posts