( प्रगत भारत । pragatbharat.com)
Patna Opposition Meet : 23 जून रोजी बिहारची राजधानी पाटणा इथं विरोधी पक्षांच्या नेत्यांची सर्वात मोठी बैठक होणार आहे. विरोधी ऐक्याची सर्वसाधारण सभा होणार आहे. या बैठकीत जेडीयू, आरजेडी, काँग्रेस, टीएमसी आणि आम आदमी पार्टी तसंच इतर अनेक पक्षांचे नेते सहभागी होणार आहेत. मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन उद्या पाटण्याच्या मंचावरून राजकीय घोषणाबाजी करतील. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी एकजुटीचा हा ट्रेलर असेल, असे मानले जात आहे.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विरोधी एकता अभियानाची धुरा सांभाळली आहे. शुक्रवारी होणाऱ्या या बैठकीत भाजपला सत्तेतून बेदखल करण्याच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विरोधी पक्षांचे नेते पाटण्याला पोहोचले आहेत.
कोण कोणते नेते होणार बैठकीत सामील
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, शरद पवार, उद्धव ठाकरे, जेडीयू, आरजेडी, हेमंत सोरेन, मेहबूबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला. याशिवाय सीपीआय, सीपीएम आणि डीएमकेचे नेतेही यात सहभागी होण्यासाठी येत आहेत.
कोणत्या राज्यात होणार काँग्रेस विरुद्ध भाजप ?
गुजरात, मध्य प्रदेश, धतीसगढ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि आसाम याशिवाय कर्नाटक, केरळ, तेलंगणा, पंजाब आणि हरियाणा. विरोधी पक्षांच्या एकजुटीने आघाडी करण्यासाठी काँग्रेस तडजोड करण्यास तयार होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तेही अशा वेळी जेव्हा कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बम्पर विजयानंतर काँग्रेस उत्साही आहे.
सभेच्या कार्यक्रमाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. ही चर्चा दुपारी 4 वाजेपर्यंत चालणार आहे. दरम्यान, सर्व राजकीय दिग्गज मंडळी एकत्र जेवण करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते SHARAD PAWAR हे प्रादेशिक पातळीवर विरोधी पक्ष म्हणून भक्कमपणे उभे राहतील आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाराष्ट्रात विरोधी ऐक्याची चर्चा पूर्ण ताकदीने कशी मजबूत करायची ते दाखवून देईल