( प्रगत भारत । pragatbharat.com)
Sawan 2023 Durlabh Yoga : हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत शुभ मानला जातो. प्रत्येक शिवभक्त श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतो. श्रावणातील सोमवारी शिवलिंगाचा रुद्राभिषेक आणि जलाभिषेक केला जातो. यंदा श्रावण महिना दोन महिने असणार आहे. 4 जुलैपासून सुरू होणारा श्रावण महिना 31 ऑगस्टपर्यंत असणार आहे.
यंदा श्रावणात 19 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे. पंचांगानुसार यंदा श्रावणसोबत अधिकमास आला आहे. अधिक मासाला काही ठिकाणी पुरुषोत्तम मास, मल मास, संसर्प मास आणि धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या अद्भुत योगामुळे काही राशींवर श्रावण महिना भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे.
मेष (Aries)
या राशीच्या लोकांवर श्रावण महिन्यात शंकर भगवानची विशेष कृपा असणार आहे. या लोकांना 59 दिवस प्रत्येक कामात यश मिळणार आहे. पगारवाढ आणि प्रमोशनची दाट शक्यता आहे. तुमचं बँक बलेन्स मजबूत स्थितीत येणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत.
मिथुन (Gemini)
या राशीवरही भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. अचानक धनलाभाचे योग आहेत. अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. परदेशवारीचे योग आहेत.
सिंह (Leo)
सिंह राशीवरही भगवान शंकराचा आशिर्वाद दिसून येणार आहे. या दोना 59 दिवस अनेक फायदे मिळणार आहेत. जुन्या समस्याचे निराकरन होईल. आर्थिक स्त्रोत वाढणार आहेत. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होईल. अडकलेले पैसे सहज तुमच्याकडे परत येणार आहे.
वृश्चिक (Scorpio)
या राशीवरही शंकर भगवानची 59 दिवस विशेष कृपा असणार आहे. जुन्या समस्या दूर होऊन तुमचं प्रत्येक काम सहज होईल. जुन्या गुंतवणुकीतून मोठा फायदा होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीचे योग आहेत.
धनु (Sagittarius)
श्रावण महिना हा धनु राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. हा दुर्मिळ योगायोग या राशीसाठी फलदायी ठरणार आहे. प्रत्येक कामात त्यांना लाभ मिळणार आहे. करिअरमध्ये यशाचं शिखर गाठणार आहे.