Smart Card Phones Replace Coin Boxes In Maharashtra Prisons, Pilot Project Launched At Yerwada Central Jail

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Yerwada jail महाराष्ट्रातील तुरुंगातील कैद्यांना आता कॉईन बॉक्स नाहीतर त्यांच्या नातेवाईकांशी स्मार्ट कार्ड फोनद्वारे संवाद साधण्याची सुविधा मिळणार आहे. येरवडा मध्यवर्ती कारागृहाने या नाविन्यपूर्ण सेवेची चाचणी घेण्यात येत आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक (तुरुंग आणि सुधारात्मक सेवा), अमिताभ गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली ही सुविधा सुरु करण्यात आली आहे. हा उपक्रम यशस्वी झाल्यास, स्मार्ट कार्ड फोन उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येईल. कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी कॉईन बॉक्स देण्यात आला होता. मात्र, बाजारात कॉईन बॉक्सेसची उपलब्धता नसल्याने आणि त्यांची दुरुस्तीची सोय नसल्याने ही यंत्रणा जीर्ण झाली होती. शिवाय, विविध सुविधा बंद केल्यामुळे कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांमधील संवादात अडथळा निर्माण झाला. 

याव्यतिरिक्त, उच्च-सुरक्षा विभाग, सुरक्षा यार्ड आणि विभक्त सेलमधील कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यासाठी कॉईन बॉक्सवर अवलंबून राहावे लागले, ज्यामुळे तुरुंगात संभाव्य सुरक्षेचे धोके निर्माण होतात. या आव्हानांना पाहून काही तुरुंग अधीक्षकांनी कॉईन बॉक्सऐवजी बेसिक मोबाईल फोन वापरण्याचा प्रस्ताव दिला. परिणामी एडीजी गुप्ता यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहात चाचणी तत्त्वावर स्मार्ट कार्ड फोन सुविधा लागू करण्याची शिफारस केली आहे. 

तामिळनाडू येथील एका कंपनीने तुरुंगातील कैद्यांना संपर्क सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आज 23 जूनपासून, पात्र कैदी महिन्यातून तीन वेळा संपर्क सेवा घेऊ शकतात, प्रत्येक सत्र 10 मिनिटे चालते. यामुळे कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात राहणे सोपे झाले आहे. नातेवाईक आणि वकिलांशी संवाद साधण्याची क्षमता केवळ कैद्यांना अनुभवत असलेला मानसिक ताण कमी करणार नाही. तर तुरुंगातील सुरक्षा वाढवण्यातही योगदान देईल. शिवाय तुरुंगात असलेल्या व्यक्तींच्या मानसिक आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा असल्यामुळे ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. येरवडा कारागृहातील स्मार्ट कार्ड फोन सुविधेचा आढावा घेतल्यानंतर या उपक्रमाचा विस्तार राज्यातील इतर कारागृहांमध्ये करण्यात येणार आहे.

 

जागा कमी अन् कैदींची संख्या दुप्पट

येरवडा कारागृहातील कैद्यांची क्षमता सध्या 2 हजार 526 इतकी आहे. मात्र त्या ठिकाणी सध्या 6 हजार 484 कैदी ठेवण्यात आले आहेत. याचा अर्थ कारागृहात दुप्पट संख्येने कैदी ठेवण्यात आले आहेत. त्यात न्यायालयीन कैद्यांची संख्या जास्त आहे त्यामुळे झोपण्याच्या जागेपासून आंघोळ, स्वच्छतागृहात जाणे अशा छोट्या मोठ्या कारणावरुन त्यांच्यात वादावादी होत असतात.

 हेही वाचा-

Pune Yerwada Jail News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैदी एकमेकांशी भिडले; 16 कैदी जखमी

[ad_2]

Related posts