India Beat Nepal By 2-0 And Enter In Semi Final Of SAFF Football : नेपाळचा धुव्वा उडवत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

बेंगळुरू : भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयासह दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (सॅफ) अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. भारतीय संघाने नेपाळचा २-० असा पराभव केला. भारताने या पूर्वी झालेल्या सामन्यात पाकिस्तानवर दमदार विजय मिळवला होता, त्यामुळे आता भारताचा उपांत्य फेरीचा मार्ग निश्चित झाला आहे.कंठीरव स्टेडियमध्ये हा सामना झाला. जागतिक क्रमवारीत भारत १०६व्या, तर नेपाळ १६८व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, या संघांतील लढतीत भारताने १६-२ असे वर्चस्व राखले होते; तसेच पाच लढती बरोबरीत सुटल्या होत्या. गेल्या सॅफ स्पर्धेत भारतीय संघाने नेपाळचा ३-२ असा पराभव केला होता. या वेळी तशाच कामगिरीसाठी भारतीय संघ उत्सुक होता. त्यातच भारतीय संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ४-० ने धुव्वा उडवला होता. साहजिकच भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला होता.

भारतीय संघात मोठे बदल करण्यात आले. पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या गेल्या सामन्यातील सुनील छेत्री, अनिरुद्ध थापा आणि साहल अब्दुल समद यांचाच ‘स्टार्टिंग इलेव्हन’मध्ये समावेश होता. पूर्वार्धात नेपाळने कडवी झुंज दिली. त्यांनी उत्तम बचाव केला आणि वेगवान प्रतिआक्रमणेही रचली. पूर्वार्धात समदला गोल नोंदवण्याची संधी होती. मात्र, ‘हेडर’द्वारे त्याने केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. चेंडू गोल पोस्टच्या बाजूने गेला. त्यानंतर, नेपाळला खाते उघडण्याची संधी मिळाली होती. मात्र, ३४व्या मिनिटाला रोहितकुमारने नेपाळच्या विमल घात्रीचा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर, ४१व्या मिनिटाला महेशसिंगने समदला संधी निर्माण करून दिली होती. मात्र, ही संधीही साधता आली नाही. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांत गोलशून्य बरोबरी कायम राहिली.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

उत्तरार्धात भारतीय संघाने आक्रमणाची धार वाढवली. ६१व्या मिनिटाला सुनील छेत्रीने मिळालेल्या संधीचे सोने केले. त्याने नेपाळचा गोलरक्षक किरण लिम्बूला चकवून भारताचे खाते उघडले. त्यानंतर आठच मिनिटांनी महेशसिंहने वेग आणि उत्तम कौशल्याच्या जोरावर गोल नोंदवून भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नेपाळने प्रतिआक्रमणे रचली. मात्र, भारतीय संघाने आघाडी कायम राखून विजयावर शिक्कामोर्तब केले.

[ad_2]

Related posts