Actress Tamannaah Bhatia Reveals The Truth About Her Affair With Virat Kohli ; तमन्ना भाटीयाचे विराट कोहलीबरोबरच्या अफेअरबाबत मोठं वक्तव्य

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : तमन्ना भाटीया ही सध्याच्या घडीला चांगलीच चर्चेत आली आहे. लग्नापूर्वी विराट कोहली आणि तिचे अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. याबाबत आता तमन्नाने मोठे वक्तव्य केले आहे.लग्नापूर्वी विराट कोहलीची छबी ही चॉकलेट बॉयसारखी होती. विराट हा मैदानात आक्रमक असायचा आणि त्याचा हा आक्रमकपणा मुलींना आवडायचा. त्यामुळे कोहली हा त्यावेळी मुलींमध्ये हॉट फेव्हरेट असल्याचे म्हटले जात होते. त्याचवेळी विराट आणि तमन्ना यांच्यामध्ये अफेअर सुरु असल्याच्या जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. हे दोघे एकमेकांना डेट करत असून लवकरच लग्न करणार, असल्याचीही चर्चा होती. पण याबाबत आता तमन्नाने स्पष्टपणे आपले मत व्यक्त केले आहे.

तमन्ना आणि विराट यांची पहिली भेट एका जाहीरातीच्या दरम्यान झाली होती. कोहली हा त्यावेळी क्रिकेटच्या मैदानाता एकामागून एक विक्रम रचत होता. त्यामुळे त्याला जाहीरातींसाठी जोरदार मागणी होती. त्यावेळी एक जाहीरात करत असताना तो तमन्नाला भेटला होता. त्यानंतर तमन्ना आणि विराट यांचे नाव जोडले गेले होते. विराट त्यावेळी भन्नाट फॉर्मात होता, त्यामुळे त्याच्या नावाचे मोठे वलय होते. तमन्ना आणि कोहली यांची जाहीरात प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर या दोघांचे अफेअर सुरु असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली होती. त्यावेळी या दोघांनीही याबाबत काहीच म्हटले नव्हते. पण तमन्नाने मात्र याबाबत स्पष्ट वक्तव्य त्यानंतर बऱ्याच वर्षांनी केले.

कोहलीबरोबर अफेअर होते का, याबाबत तमन्ना म्हणाली की, ” विराट आणि माझी एका जाहीरातीमध्ये भेट झाली होती. तिथे आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो. त्यावेळी सेटवर जाहीरातीबाबत माझी आणि विराटची चर्चा झाली होती. त्यानंतर आमच्यामध्ये अफेअर असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. पण तुम्हाला खरं सांगायचं तर आम्ही जेमतेम ४-५ मिनिटं एकमेकांशी बोललो होतो. त्यामुळे आमच्यामध्ये अफेअर असण्याची कोणतीही शक्यता नव्हती. पण याबाबत चर्चा मात्र जोरदार सुरु झाली होती.”

माझा नंबर बऱ्याच जणांकडे, पण कर्णधारपद सोडल्यानंतर फक्त धोनीचा मेसेज आला | विराट कोहली

विराट कोहली आणि तमन्ना भाटीया हे एका जाहीरातीमध्ये एकत्र भेटले होते. त्यानंतर या दोघांमध्ये अफेअर असल्याची जोरदार चर्चा होती. पण याबाबत आता स्पष्ट मत तमन्नाने व्यक्त केली आहे.

[ad_2]

Related posts