[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weather Update : देशातील वातावरणात बदल (Climate change) होत आहे. काही भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. या पावसामुळं नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. सध्या दिल्लीसह (Delhi) उत्तर भारतात जोरदार पाऊस पडत आहे. तसेच मुंबईतही चांगला पाऊस पडत आहे. हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं (IMD) दिली आहे. येत्या काही दिवसांत दिल्लीसह मुंबईत मान्सून दाखल होणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
दरवर्षी परिस्थिती मान्सून लवकर दाखल होतो. यावेळी मात्र, मान्सून दाखल होण्यास वेळ लागला आहे. यंदा मान्सूनवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम झाला असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. दरम्यान, उत्तर भारतातील काही राज्यात पावसानं चांगली हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. मान्सूनसाठी सध्या वातावरण अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल
नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यतः केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र प्रथम व्यापतो. त्यामुळं सुरुवातील दक्षिणेकडे पाऊस पडतो. त्यानंतर तो दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरुन पुढे सरकतो. त्यानंतर देशभरात पाऊस सुरु होतो. देशातील अनेक राज्यांमध्ये वर्षभरातील पावसाचे प्रमाण सामान्य राहिले आहे. मुंबई, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू, काश्मीर आणि लडाख, चंदीगड आणि दिल्लीसह हरियाणाच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, पुढील 48 तासांत गुजरात, पूर्व राजस्थान आणि पंजाबच्या काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
उत्तर पश्चिम भारतात यलो अलर्ट जारी
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 30 सध्या सुरु असलेली पावसाची प्रक्रिया सुरु राहणार आहे. दरम्यान, दिल्लीत शनिवारी कमाल तापमान हे 37.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, तर किमान तापमान 30.4 अंश नोंदवले गेले. त्याचवेळी हवामान खात्याने उत्तर पश्चिम भारतात पुढील सहा दिवस पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. या दिवसात तापमानात वाढ आणि घट अपेक्षित आहे.
महाराष्ट्रात विविध भागात जोरदार पाऊस
राज्याच्या विविध भागात पावसानं (Rain) हजेरी लावली आहे. कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा तर कुठे जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईत कालपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसाच मुंबईची तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यातील वाशिम, सोलापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पालघर, वसई विरार, कोल्हापूर या भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.
महत्त्वाच्या बातम्या:
Maharashtra rain : राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस, सोलापुरात नागरिकांच्या घरात शिरलं पाणी
[ad_2]