Malavya Rajyog : शुक्र गोचरमुळे मालव्य राजयोग! ‘या’ राशींना बक्कळ धनलाभ होणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Malavya Rajyog, Mahadhan Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर प्रत्येक ग्रह आणि नक्षत्र आपलं स्थान बदलतो. जून महिना संपत आल्या असून जुलै महिन्यांला येता शनिवारपासून सुरुवात होईल. जुलैच्या पहिला आठवडा हा ग्रह गोचरच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे.  7 जुलैला 3:59 वाजता शुक्र ग्रह (venus transit) कर्क राशीतून सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

 शुक्र गोचर (Shukra Gochar 2023)

7 जुलैनंतर शुक्र ग्रह पुन्हा 23 जुलैला सकाळी 6:01 वाजता तो पुन्हा एकदा प्रतिगामी होईल आणि 7 ऑगस्टला सकाळी कर्क राशीत परतणार आहे. शुक्राच्या या राशी बदलामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. हा अतिशय शुभ योग अनेक राशींसाठी भाग्यवान सिद्ध होणार आहे.  (venus transit formed malavya rajyog  zodiac signs will shine at Shukra Gochar 2023 mahadhan rajyog)

मेष (Aries)

या राशींच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. प्रेमसंबंधात आनंद असणार आहे. कुटुंबातील सदस्यांच्या इच्छा पूर्ण कराल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री होईल. धनलाभासह समाजात मान सन्मान वाढणार आहे. 

वृषभ (Taurus)

या राजयोगामुळे या राशीच्या कुटुंबात आनंदच आनंद असणार आहे. या लोकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. कामाचं कौतुक होणार आहे. भौतिक सुख-सुविधांचा मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे. 

मिथुन (Gemini)

या राशीच्या लोकांसाठी हा राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. आयुष्यात प्रेम करणारा साथीदार मिळणार आहे. प्रवासाचे योग आहेत ज्यातून तुम्हाला फायदा होणार आहे. अचानक धनलाभ होणार आहे. 

कर्क (Cancer)

शुक्र गोचरमुळे तयार होणाऱ्या राजयोगाचा कर्क राशीच्या लोकांना सर्वाधिक लाभ होणार आहे. तिजोरी छोटी पडले एवढी संपत्ती मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढणार आहे. धनसंपदा वाढणार आहे. 

महाधन राजयोग ( Mahadhan Rajyog)

कुंडलीतील गुरु (Guru Gochar 2023) हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ ग्रह आहे. 18 महिने एका राशीत राहिल्यानंतर गुरु दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. मेष राशीत गुरुचं स्थान असल्याने महाधन राजयोग सुरु झाला आहे. 

वृषभ (Taurus)

वृषभ राशीसाठी गुरुचा उदय अतिशय भाग्यशाली आहे.  मोठ्या प्रमाणात धनलाभ होणार आहे. उत्पन्नाचे अनेक मार्ग दिसणार आहे. भौतिक सुखसोयीमध्ये तुमचं कुटुंब नांदणार आहे. हा काळ या राशींसाठी सर्वात उत्तम असणार आहे. 

सिंह (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी महाधन राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. आत्मविश्वासासोबतच आर्थिक प्रगती होणार आहे. बँक बॅलेन्स वाढणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे. 

मकर (Capricorn)

महाधन राजयोग मकर राशीच्या लोकांचं नशीब पालटणार आहे. करिअरसोबतच आर्थिक स्थिती मजबूत करणार आहे. अनेक मार्गाने या लोकांना आर्थिक लाभ होणार आहे. कार्य क्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. 

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

 

Related posts