PM Modi Award List Last 9 Years PM Narendra Modi International Awards Order Of The Nile Complete List Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

PM Modi Award List: इजिप्तचा (Egypt) सर्वोच्च सन्मान असलेला ‘ऑर्डर ऑफ द नाईल’ या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्रल मोदींना मिळालेला हा 13 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. गेल्या नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अल – सीसी यांच्या हस्ते पंतप्रधानांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द नाईल या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याची माहिती इजिप्तचे राष्ट्रपती  अब्देल फताह अल-सिसी यांनी दिली. त्यांनी म्हटलं की, ‘हा इजिप्तचा सर्वोच्च राजकीय पुरस्कार आहे.’ पंतप्रधान मोदी यांच्या इजिप्तच्या दौऱ्यामुळे इजिप्तच्या अनेक नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. मूळचे भारतीय असलेले बोहरा मुस्लिम समाजाचे सदस्य शुजाउद्दीन शब्बीर तांबावाला यांनी म्हटलं की, ‘आजचा दिवस आमच्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे कारण पंतप्रधान मोदी यांनी अल – हकीम या मशीदीला भेट देऊन आमच्यासोबत संवाद साधला.’
 

पंतप्रधान मोदी यांनी गेल्या नऊ वर्षांच्या काळात मिळालेले सर्वोच्च सन्मान 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. गेल्या नऊ वर्षांच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एकूण तेरा सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

  • मे 2023 – कम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ लोगोहू, पापुआ न्यू गिनी या देशाने प्रदान केलेला सर्वेच्च नागरी पुरस्कार
  •  मे 2023 – कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी , पंतप्रधान मोदी यांच्या जागतिक नेतृत्वाची ओळख म्हणून फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान.
  •  मे 2023 – पलाऊ देशाकडून देण्यात आलेला इकबाल पुरस्कार. 
  • डिसेंबर 2021 – ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो, भूतानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. 
  • 2020 – लीजन ऑफ मेरिट, अमेरिकेच्या सशस्त्र दलाने दिलेला पुरस्कार. 
  • 2019 – किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसाँ, आखाती देशाचा सर्वोच्च सन्मान. 
  • 2019 – ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश्ड रुल ऑफ निशान इज्जुद्दीन, मालदिवकडून परदेशी मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान. 
  • 2019 – ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू पुरस्कार, रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान. 
  • 2019 – ऑर्डर ऑफ झायेद पुरस्कार, संयुक्त अरब अमिरातीचा सर्वोच्च नागरी सन्मान. 
  • 2019 – ग्लोबल गोलकीपर पुरस्कार,  बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनकडून स्वच्छ भारत अभियानासाठी करण्यात आलेला सन्मान. 
  • 2018 – ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार, पॅलेस्टाईनकडून परदेशा मान्यवरांना देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान. 
  • 2016 – स्टेट ऑर्डर ऑफ गाजी अमीर अमानुल्ला खान , अफगाणिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे.
  • 2016 – ऑर्डर ऑफ अब्दुलअजीज अल सौद, सौदी अरेबियाचा सर्वोच्च सन्मान. 

महत्त्वाच्या इतर बातम्या  :

पंतप्रधान मोदींनी घेतली इजिप्तच्या ग्रँड मुफ्तींची भेट; सांस्कृतिक संबंधांपासून धार्मिक सौहार्दापर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा



[ad_2]

Related posts