7 Trekking Spots Near Mumbai Pune Visit These Forts If You Are Going For Trekking In Monsoon

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Monsoon: आता मान्सूनने (Monsoon) महाराष्ट्र व्यापला असून सर्वत्र पावसाचा जोर असल्याचं दिसून येतंय. पाऊस म्हटलं की अनेक गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात, वाफाळलेला चहा आणि गरमागरम भजी… तसेच पावसाळा म्हटलं की आणखी एक गोष्ट आवर्जून आपल्यासमोर येते आणि ती म्हणजे ट्रेकिंग. पाऊस सुरू झाला की अनेकांची पावलं गड-किल्ल्यांकडे वळतात. तरुणाईमध्ये ट्रेकिंगला जाण्याचं वेगळंच क्रेझ असतं. अशा वेळी पावसाळ्यात ट्रेकिंगला जायचं कुठे? असा प्रश्न पडला असेल तर या काही गड-किल्ल्यांना तुम्ही भेट देऊ शकता.

1. हरिहर किल्ला, नाशिक (Harihar Fort, Nashik)

पावसाळ्याच्या अल्हाददायी वातावरणात त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ल्याला भेट देणं उत्तम ठरेल. हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या चढाईसाठी अवघड असल्या तरी उंचावरुन दिसणारं निसर्गाचं नयनरम्य दृश्य डोळ्याची पारणं फेडतं. हरिहर किल्ला (Harihar Fort) हा ट्रेकिंगसाठी थोडा अवघड असला तरी ते साहस करण्यास तरुणाईला आवडतं. ट्रेकिंगवेळी खबरदारी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. हरिहर किल्ल्यावर (Harihar Fort) ट्रेकिंगसाठी नाशिकसह नगर, ठाणे आणि मुंबईतून पर्यटक येत असतात. इगतपुरी-त्र्यंबक पट्ट्यातील हा गड असल्यामुळे येथे पावसाचे प्रमाण जास्त आहे.

2. कळसुबाई, इगतपुरी (Kalsubai, Igatpuri)

ज्यांना साहसी आणि आव्हानात्मक गड चढायला आवडतं अशा लोकांसाठी कळसुबाई हे उत्तम ठिकाण ठरेल. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे. पावसाळा सुरू झाली की पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची अफाट गर्दी कळसुबाईवर (Kalsubai, Akole) होते. कळसुबाई शिखर चढताना पायवाटांवरुन खाली पाहिल्यास तुम्हाला हिरवीगार शेती दिसेल. चढाईसाठी पर्यटकांना सोपं जावं म्हणून अधेमधे शिड्या देखील बसवण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात तुम्ही कळसुबाईवर (Kalsubai) गेलात तर उंचावर धुकं पसरलेलं दिसेल. कळसुबाईच्या (Kalsubai) अंतिम पॉईंटवर पावसाळ्यात कमालीची थंडी असते, सोबतच पावसाचा मारा होत असल्याने येणारी मज्जा काही वेगळीच असते.

3. हरिश्चंद्रगड, इगतपुरी (Harishchandragad, Igatpuri)

सह्याद्री पर्वतरांगेत (Sahyadri Ranges) वसलेला आणि कळसुबाई (Kalsubai) शिखराला लागून असलेला हरिश्चंद्रगड (Harishchandragad) म्हणजे समस्त ट्रेकर्सची पंढरी. ट्रेकिंगचं वेड असलेला प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी हरिश्‍चंद्रगडावर (Harishchandragad) जाऊन येतोच. गडावरील शिवमंदिर, पुष्पकर्णी,तिथल्या गुहेत घालवलेली रात्र हे सगळं प्रत्येकानं अनुभवावं असंच आहे. हरिश्चंद्रगड (Harishchandragad) गडावरील कोकणकड्याला जाणं हा तर एक अद्भूत अनुभव आहे. पावसाळ्यात गर्द धुक्यांमध्ये हा गड हरवून जातो आणि मग त्यातून वाट काढत जाण्यात अनोखी मज्जा असते. कसारा स्थानकातून एसटी किंवा जीपने तुम्ही या गडांना भेट देऊ शकता.

4. रतनगड, इगतपुरी (Ratangad, Igatpuri)

अहमदनगर (Ahmednagar) जिल्हातील अकोले (Akole) तालुक्यातच रतनगड, कळसूबाई, हरिश्चंद्रगड हे गडकिल्ले आहेत. एकाच पट्ट्यातील या गड किल्ल्यांवर पावसाळ्यात ट्रेकर्सची गर्दी होते. ट्रेकिंगदरम्यान वाटेत असणाऱ्या रंगीबेरंगी फुलांमुळे रतनगडचा (Ratangad) प्रवास मन मोहून टाकतो. हलक्या हलक्या धुक्यात गड सर करण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. रतनगडावरुन (Ratangad) सांधण दरीची (Sandhan Valley) मनमोहक दृश्य देखील दिसतात. गणेश दरवाजा, प्रवरा नदीचे उगमस्थान, विविध बुरुज, कल्याण दरवाजा ही रतनगडावरील (Ratangad) पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.

5. कोरीगड किल्ला, लोणावळा (Korigad Fort, Lonavala)

लोणावळा (Lonavala) शहरापासून साधारण 25 किलोमीटरवर कोरीगड किल्ला (Korigad Fort) आहे. कोरीगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा आहे. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही हा किल्ला अगदी सहजपणे सर करू शकतो. पहिल्यांदाच ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. किल्ल्याकडे तुम्ही कारने किंवा बसने जाऊ शकता. कोरीगड किल्ल्याकडे (Korigad Fort) जातानाचा रस्ता नेहमी धुक्यात हरवलेला असतो, त्यामुळे पावसाळ्यातील अल्हाददायक वातावरण अनुभवण्याची संधी तुम्हाला मिळते. कोरीगड किल्ला (Korigad Fort) हा पायऱ्या-पायऱ्यांचा किल्ला आहे. या पायऱ्यांवरुन धबधब्यासारखं पाणी वाहत असतं, त्यामुळे हे मनमोहक दृश्य अनुभवायचं असल्यास पावसाळ्यात एकदा नक्की या किल्ल्याला भेट द्या.

6. लोहगड किल्ला, लोणावळा (Lohgad Fort, Lonavala)

ट्रेकिंगसाठी लोणावळ्यातील लोहगड किल्ला (Lohgad Fort) हा पर्यटकांचा अतिशय आवडता आहे. पावसाळा सुरू झाला की मुंबई-पुण्यातील पर्यटकांची पावलं आपोआप लोहगडाकडे (Lohgad Fort) वळू लागतात. लोहगडावर (Lohgad) अनेक ऐतिहासिक ठिकाणं आहेत. विंचुकडा, उलटा धबधबा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा अशी पाहण्यासारखी ठिकाणं आहेत. या किल्ल्यावरुन पवना धरणाची मनमोहक दृश्य दिसतात. पायऱ्यांचा रस्ता आणि लोहगडाला (Lohgad) लाभलेला ऐतिहासिक वारसा यामुळे या किल्ल्याचं सौंदर्य आणखी वाढतं.

7. कलावंतीण दुर्ग, पनवेल (Kalavantin Durg, Panvel)

पावसाळा आला की पनवेल शहराजवळ असणाऱ्या कलावंतीण दुर्गाकडे (Kalavantin Durg) ट्रेकर्स मंडळींची पावलं वळतात. कलावंतीण दुर्गावरील (Kalavantin Durg) निमुळत्या पायऱ्या, त्यावरुन कोसळणारं धबधब्यासारखं पाणी आणि दुसऱ्या बाजूला खोल वाट असं चित्तथरारक दृश्य येथे पाहायला मिळतं. पावसाळ्यात कलावंतीण दुर्गावर (Kalavantin Durg) जात असाल तर थोडी खबरदारी घेतली पाहिजे. दुर्गाच्या पायवाटांवरची एका बाजूच्या जागेला कसलाच आधार नसल्याने सरळ खाली पडण्याची भीती असते, त्यामुळे ज्यांना उंचीची भीती असते अशा लोकांनी कलावंतीण दुर्गावर (Kalavantin Durg) जाणं टाळावं. मात्र ट्रेकर्ससाठी हा एक चित्तथरारक अनुभव ठरेल. मुंबई-पुण्याचे लोक पावसाळ्यात या गडाला आवर्जुन भेट देतात. कलावंतीण दुर्गाला (Kalavantin Durg) लागूनच प्रबलमाची किल्ला असल्याने तिथे देखील गिर्यारोहकांची गर्दी असते.

हेही वाचा:

Maharashtra: पावसाळा आला! विकेंडला फिरायचा प्लॅन करताय? तर ‘या’ पर्यटनस्थळांना एकदा भेट द्यायलाच हवी

[ad_2]

Related posts