Youtube Content Creators Can Dub Now Videos Their Other Languages Through Ai Base Tool Aloud By Youtube Tech News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

YouTube Video dub :  गेल्या काही महिन्यापासून एआय टूलची चर्चा सुरू आहे. या टूलच्या निर्मितीने अनेक क्षेत्रावर परिणाम होऊन बदल होताना दिसून येईल असं बोललं जात होतं. आता हा बदल व्हायला सुरूवात झाली आहे. गुगलचा व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब लवकरच कंटेट क्रिएटर्ससाठी एक भन्नाट एआय टूल घेऊन येणार आहे. या टूलच्या मदतीने व्हिडीओला आपल्या मातृभाषेत डब करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

याशिवाय कंपनीकडून युट्युब गेम्स आणण्यासाठीही विचार करण्यात येत आहे. मात्र, सध्या तरी युट्यूबमध्ये कंटेटची निर्मिती करण्यासाठी कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सध्या तरी तुम्हाला दुसऱ्या भाषेत यूट्यूब व्हिडीओ डब (YouTube Video dub) करायचं असेल, तर थर्ड पार्टी अॅप्सची मदत घ्यावी लागते. पण लवकरचं युट्यूब कंटेट क्रिएटर्ससाठी Aloud या नावाचं टूल उपलब्ध करून देणार आहे. हे गुगलची निर्मिती असलेलं एआय (AI) टूल आहे. या टूलमुळे यूट्यूब कंटेट क्रिएटर्सना आपल्या कंटेटला इतर भाषेत डब करता येणार आहे. ही सुविधा सध्या तरी सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे.

गेल्या वर्षीच गुगलने एआय पॉवर्ड डबिंग टूल Aloud सादर करण्यात आलं होतं. जे स्वयंचलितपणे व्हिडीओला ट्रान्स्क्राइब करून त्याचं डब व्हर्जन तयार करू शकतं. हे टूल डब जनरेट करण्याआधी ट्रान्सक्रिप्शनचं पुनरावलोकन आणि एडिट करण्याचं ऑप्शनही उपलब्ध करून देतं. यामुळे आता क्रिएटर्स आपल्या मर्जीनुसार कंटेटला मॉडिफाई़ड करू शकतात. याठिकाणी आम्ही युजर्सना समजण्यासाठी Aloud टूलच्या मदतीने डब करण्यात आलेला व्हिडीओ जोडत आहोत. या व्हिडीओचा ऑडिओ ट्रॅक बदलण्यासाठी व्हिडीओच्या सेटिंग आयकॉनवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ज्या भाषेत व्हिडीओ ऐकायचं आहे ती भाषा निवड करा. ही भाषा निवडण्यासाठी ऑडिओ ट्रॅकवर जाऊन टॅप करा. 

सध्या या भाषांना सपार्टेड आहे Aloud टूल

सध्या तरी गुगलचं एआय टूल Aloud इंग्रजी, पोर्तुगीज आणि स्पॅनिश भाषेत उपलब्ध आहे. या टूलमध्ये कंपनी इतर भाषा जोडण्यासाठी प्रयत्न करत आहे. यामुळे कंटेट निर्मितीमध्ये वैविध्य दिसून येईल. यावर यूट्यूब क्रिएटर प्रोडक्टचे उपाध्यक्ष अमजद हनिफ यांनी म्हटलंय की, ‘शेकडो क्रिएटर्सनी या टूलची टेस्टिंग सुरू केली आहे आणि लवकरच हे टूल सर्वांसाठी उपलब्ध होईल. भविष्यात जनरेटिव्ह  आर्टिफिशियल इंटेलिजन्स  व्हाईस सिक्युरिटी,लिप री-अॅनिमेशन आणि इमोशन ट्रान्सफर सारख्या सुविधा देण्यासाठी Aloud टूलला देखील मदत करणार आहे.’

इतर  महत्त्वाच्या भाषा वाचा :

Youtube Top 10 Video : ‘श्रीवल्ली’पासून ‘कच्चा बादाम’पर्यंत यूट्यूबवर ‘हे’ व्हिडीओ ठरले लोकप्रिय, यूट्यूबकडून यादी जारी

[ad_2]

Related posts