ODI World Cup 2023 Schedule Announcement By ICC ; भारतातील ODI World Cup चं वेळापत्रक कधी जाहीर होणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पाकिस्तानच्या अनेक अडथळ्यांनंतर आता भारतामधील ODI World Cup चे वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात येणार आहे. हे वेळापत्रक कधी आणि कुठे जाहीर करण्यात येणार आहे, याची माहिती आता आयसीसीने दिली आहे.भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप वन-डे क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाची घोषणा येत्या मंगळवारी अपेक्षित आहे. मुंबईत २७ जूनला आयसीसीने वर्ल्ड कपबाबत खास कार्यक्रम होईल, असे जाहीर केले आहे. त्यात स्पर्धेतील सामन्यांची ठिकाणे आणि तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कप स्पर्धेच्या कार्यक्रमात अनेक अडथळे आणल्यामुळे कार्यक्रम निश्चित होण्यास विलंब झाला आहे. आता हा कार्यक्रम २७ जूनला जाहीर होईल. वर्ल्ड कप वन-डे क्रिकेट स्पर्धा ५ ऑक्टोबरपासून सुरू होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचे शंभर दिवसांचे काउंटडाउन २७ जूनपासून सुरू होईल. त्याच वेळी या कार्यक्रमाची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

पाकिस्तानात होणाऱ्या आशियाई क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ खेळणार नाही, हे भारतीय क्रिकेट बोर्डाचे सचिव जय शहा यांनी गतवर्षीच्या डिसेंबरमध्ये जाहीर केले. तेव्हापासून दोन देशांच्या क्रिकेट बोर्डातील वाद वाढला आहे. पाकिस्तान सातत्याने वर्ल्ड कपमधील सहभागाबाबत अनिश्चितता निर्माण करीत आहे. त्यातच पाकिस्तान बोर्डाने प्रस्तावित कार्यक्रमास अद्याप मान्यता दिलेली नाही. पाकिस्तान बोर्ड आयसीसीने प्रस्तावित केलेल्या वर्ल्ड कप कार्यक्रमास होकार लवकरच देईल आणि २७ जूनला या कार्यक्रमाची घोषणा होऊ शकेल, अशी आशा आयसीसीला आहे.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

पाकिस्तानने काही आठवड्यांपूर्वी भारताविरुद्धची साखळी लढत अहमदाबादमध्ये खेळणार नाही अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे ही लढत चेन्नईत होण्याची शक्यता आहे. त्या वेळी सुरक्षेचे कारण दिले होते. त्यानंतर काही दिवसांनी पाकचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध चेन्नईत खेळण्यास तयार नाही. तेथील खेळपट्टी फिरकी गोलंदाजीस अनुकूल आहे, असे पाकने सांगितले होते. त्यामुळे आमची ऑस्ट्रेलियाविरुद्ध बेंगळुरूला होणारी लढत चेन्नईत खेळवण्यात यावी आणि चेन्नईतील अफगाणिस्तानविरुद्धची लढत बेंगळूरूमध्ये व्हावी असे पाक बोर्डाने सुचवले होते; पण ही सूचना आयसीसीने फेटाळली आहे.

[ad_2]

Related posts