रशियन कुठे मिळेल? पोस्टर घेऊन मुलींच्या गराड्यात फिरत होता, आता पोलिसांनीच दिलं उत्तर| Man Roams With Russian Kaha Milegi Poster Around Girl Students In Muzaffarnagar College Premises in up video viral

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Social Media Viral Video: सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक नवीन ट्रेंड आला आहे. (Social Media New Trend) साइनबॉर्डचा वापर करुन सामाजिक व राजकीय परिस्थीतवर मीम (Meme) करुन लोकांचे मनोरंजन करण्यात येते. अनेक सोशल मीडिया इन्फुअर्सने (media influencer) नवनवीन विषय हाताळून सामाजिक व राजकीय विषयावर या माध्यमातून भाष्य केलंय. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक भलताच प्रकार समोर आला आहे. भल्या मोठ्या साइनबॉर्डवर तरुणाने असं काही लिहलं होतं की पोलिसांनीच त्याला थेट उत्तर दिलं आहे. (Viral Video News in Marathi)

कॉलेजमध्ये फिरत होता तरुण

उत्तर प्रदेशातील श्री राम कॉलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. कॉलेज परिसरात एक तरुण हातात एक साइनबॉर्ड घेऊन उभा आहे. यावर मुझफ्फर मे रशियन कहा मिलेगी? (मुझ्झफरमध्ये रशियन मिळेल का?) अशा आशयाचा आक्षेपार्ह मजकूर लिहला आहे. तसंच, तो तरुण हा मजकूर लिहलेला बोर्ड घेऊन महाविद्यालय परिसरात फिरत आहे, काहींना याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तरुणावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. 

विद्यार्थिनींच्या गराड्यात फिरत होता

महाविद्यालात अशाप्रकारे आक्षेपार्ह मजकूर लिहणं चुकीचं आहे, असं मत अनेकांनी सोशल मीडियावर व्यक्त केलं आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओत तरुण हातात बोर्ड घेऊन महाविद्यालय परिसरात फिरत आहे. तसंच, कॉलेजच्या अवारात असलेल्या विद्यार्थ्यांभोवती तो फिरत आहे. महिला विद्यार्थिनीं तसे विद्यार्थ्यांभोवतीही तो बोर्ड घेऊन फिरताना दिसत आहे. बोर्डवरील मजकूर पाहून काही विद्यार्थिनींनी शरमेने मान खाली घातली आहे. या व्हडिओवरुन सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

व्हायरल व्हिडिओवर पोलिसांनी केलं ट्विट

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो पोलिसांपर्यंतही पोहोचला आहे. पोलिसांनी या व्हिडिओची गंभीर दखल घेतली आहे. व्हिडिओवर ट्विट करत योग्य ती कारवाई घेण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. व्हायरल व्हिडिओवर योग्य ती कायदेशीर कारवाई नवीन मंडी पोलिसांकडून करण्यात आली आहे, असं पोलिसांनी म्हटलं आहे. 

मुंबई- गोवा महामार्गाचा व्हिडिओ व्हायरल

पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्गाची दाणादाण उडाली आहे. कणकवली येथे बांधण्यात आलेल्या पुलावरुन दुधडीभरुन पाणी खाली कोसळताना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर धबधबे कोसळू लागल्याने रहदारीसाठी मोठा त्रास सहन करावा लागतो आहे. याचा व्हिडिओ शनिवारी व्हायरल झाला आहे. 

 

Related posts