Cheteshwar Pujara And Suryakumar Yadav Will Play For After Dropped From Indian Team ; कसोटी संघातून वगळल्यावर पुजारा आणि सूर्यकुमार आता कोणत्या संघाकडून खेळणार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादव यांना भारताच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे ते आता भारताच्या कसोटी संघात दिसणार नाहीत. पण त्यानंतर मात्र पुजारा आणि सूर्या आता एका दुसऱ्या संघातून खेळणार असल्याचे समोर आले आहे.वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघातून वगळलेला चेतेश्वर पुजारा आणि सूर्यकुमार यादवची पश्चिम विभागीय संघात निवड झाली आहे. भारतीय संघात निवडलेल्या यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाडऐवजी त्यांना निवडण्यात आले आहे. दुलीप करंडक विभागीय स्पर्धा २८ जूनपासून बेंगळुरूला होणार आहे. पश्चिम विभाग संघाला उपांत्य फेरीत थेट प्रवेश देण्यात आला आहे. त्यांची लढत मध्य आणि पूर्व विभाग यांच्यातील विजेत्यांविरुद्ध होणार आहे. पश्चिम विभागीय निवड समितीने निवडलेल्या संघात फारसे बदल झाले नाहीत. निवडलेल्या मूळ संघातील ऋतुराज आणि यशस्वी यांच्याऐवजी पुजारा आणि सूर्यकुमारची निवड झाली आहे. मुंबई क्रिकेट संघटनेचे संजय पाटील पश्चिम विभागीय निवड समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी संघातील हे बदल जाहीर केले.

प्रामुख्याने मर्यादित षटकांच्या लढतीसाठी उपयुक्त समजला जात असलेला सूर्यकुमार यादव हा कसोटी जगज्जेतेपद लढतीसाठी राखीव खेळाडू होता. त्याची विंडीजविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी निवड झाली असली, तरी त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. दुलीप स्पर्धेची सांगता १६ जुलैस होईल, तर विंडीजविरुद्धची वन-डे मालिका २७ जुलैपासून होणार आहे.

संघव्यवस्थापनाबरोबरील चर्चेनंतर…
भारताच्या कसोटी संघातून वगळल्यामुळे चेतेश्वर पुजारा कमालीचा नाराज होता. तो देशांतर्गत स्पर्धेत खेळण्यास तयार नव्हता; मात्र भारतीय क्रिकेट बोर्डातील वरिष्ठ पदाधिकारी आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी पुजारासह चर्चा केली. त्यानंतरच पुजाराने दुलीप स्पर्धेत खेळण्याची तयारी दाखवली असल्याचे समजते.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

पुजारा हा फक्त भारताच्या कसोटी संघातूनच खेळतो. त्यामुळे त्याला संधी न दिल्यामुळे त्याचे करीअर संपले, अशा चर्चा सध्याच्या घडीला सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पुजारा आता भरातीय संघात पुनरागमन करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.

[ad_2]

Related posts