Avika Gor Weight Loss Journey Reduced 20 Kg Shocking Transformation; अत्यंत कठीण होता ‘बालिका वधू’ फेम अविका गोरचा Weight Loss प्रवास, २० किलो वजन घटवले

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अविकाने शेअर केला प्रवास

अविकाने शेअर केला प्रवास

अविकाने मुलाखतीदरम्यान आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत सांगितले होते. नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने वजन कमी करण्याचा प्रवास अत्यंत कठीण असल्याचे सांगितले.

वर्कआऊट गरजेचे

वर्कआऊट गरजेचे

रोज वर्कआऊट करण्यासाठी तिला स्वतःला मानसिकरित्या तयार करायला लागत होते. याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींनीही प्रोत्साहन दिले. अविकाच्या म्हणण्याप्रमाणे बरेचदा वर्कआऊट करणंही तिला आवडत नव्हतं. पण हे अत्यंत गरजेचे आहे आणि ते जमत नसेल तर किमान चालायला हवं.

(वाचा – मासिक पाळीतील पोटदुखीचा त्रास होईल १० मिनिट्समध्ये बंद, ३ वनस्पती करतील चमत्कार)

रोज इतकी पावलं चालते अविका

रोज इतकी पावलं चालते अविका

अविकाने चालणे आणि डाएट फॉलो करून २० किलो वजन कमी केले. तसंच तिने सुरूवातीपासूनच इंटेन्स वर्कआऊटचाही आधार घेतला. इतकंच नाही तर स्वतःला फिट ठेवण्यासाठी अविका रोज २५ हजार पावलं चालते.

आपल्या डाएटवर नियंत्रण ठेवत अविकाने मीठ आणि साखरेवरही नियंत्रण आणले आहे. अत्यंत कमी प्रमाणात मीठ आणि साखरेचे सेवन अविका करते, ज्यामुळे मूड स्विंग्ज होणार नाहीत.

(वाचा – 21 दिवस अशा पद्धतीने प्या पाणी, अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता होईल छूमंतर)

डान्स हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

डान्स हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

वर्कआऊटशिवाय अविकाने डान्सद्वारेदेखील आपले वजन कमी केले. याबाबत खुलासा करताना अविकाने सांगितले की, डान्स केल्यामुळे शरीरामध्ये लवचिकता येण्यास आणि Slim Figure कमाविण्यासाठी मदत मिळाली. तसंच योग्य आहार आणि खाण्याची वेळ पाळणं या गोष्टीही अविका काटेकोरपणे पाळते आणि त्यामुळेच वजन कमी करणे तिला शक्य झाल्याचे तिने सांगितले.

(वाचा – पोटावरील चरबी सर्रकन जाळण्यासाठी उपयुक्त ठरतील ५ सुपरफूड्स, आहारात करा समाविष्ट)

[ad_2]

Related posts