Opening The Manhole Cover Is Now A Punishable Offence Strict Action Will Be Take By Authorities Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BMC Manhole Decision:  पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर पालिकेकडून (BMC) अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु असल्याने अनेक मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबते. अशा वेळेस जर मॅनहोलचे (Manhole) झाकण उघडे असेल तर दुर्घटना होण्याची शक्यता असते. त्यामुळे मॅनहोलचे झाकण न उघडण्याचे प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तर या मॅनहोलचे झाकण उघडल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे. 

तर मॅनहोलची झाकणं जर उघडी दिसली किंवा चोरीला गेल्याची घटना घडली तर त्यबाबत विभागीय पातळीवर तक्रार करण्याचे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दरम्यान मॅनहोलवरील झाकण उघडणे हा दंडनीय अपराध असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. या संबंधी काय करावे, काय करू नये यासंदर्भातली नियमावली देखील पालिकेकडून जाहीर करण्यात आली आहे. 

नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सूचना

  • महानगरपालिकेच्या अधिकृत कर्मचा-यांशिवाय इतर कोणीही मॅनहोलचे झाकण उघडू नये.
  • जर मॅनहोलवरचे झाकण उघडे असेल तर त्यामध्ये पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. 
  • दरम्यान पालिका कर्मचाऱ्यांशिवाय इतर कोणीही हे झाकण उघडल्यास संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच संबंधितांवर कलम  336, 337, 338, 304, 308 या अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. 

झाकण खरेदी करणाऱ्यांवर देखील होणार गुन्हा दाखल

दरम्यान कोणीही मॅनहोलवरील चोरीला, गहाळ झालेली किंवा बनावट झाकणं खरेदी न करण्याचं आवाहन देखील व्यापाऱ्यांना करण्यात आलेलं आहे. जर अशी पद्धतीची झाकणं कोणी विकत घेतली तर त्यांच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे. 

मागील काही दिवसांमध्ये मॅनहोलमध्ये पडण्याच्या दुर्घटना 

जगवीर यादव हा व्यक्ती सफाई करण्यासाठी मॅनहोलमध्ये उतरला होता. सफाई करत असताना तो खाली वाकून राहिला होता. अचानक समोरून एक कार आली आणि त्याच्या अंगावर गेली. त्यामुळे तो मॅनहोलमध्येच अडकला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्याच्या साथीदारांनी त्याला जखमी अवस्थेत बाहेर काढले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.मात्र उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला.

तर गोवंडीत देखील अशाच प्रकारची दुर्घटना घडली होती. मुंबईतील गोवंडी परिसरातील शिवाजी नगर भागात मुंबई महानगरपालिकेकडून मॅनहोलमध्ये (manhole) सफाई करण्यास उतरलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पावसाच्या दिवसामुळे मॅनहोलमधील मलनिस्सारण करण्याचे काम केले जात आहे. तेच काम गोवंडी परिसरात सुरु होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Manhole Death : ड्रेनेज लाईन साफ करणासाठी मॅनहोलमध्ये उतरला, वरती येताच अंगावरुन गाडी गेली; उपचारादरम्यान मृत्यू

[ad_2]

Related posts