Ms Dhoni Viral Video Playing Candy Crush In Flight Candy Crush Got 36 Lakh New Downloads In Just 3 Hours

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dhoni Playing Candy Crush in Flight : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. धोनीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पण यामागचं कारण क्रिकेट नसून काही वेगळंच आहे. कॅप्टन कूल धोनी इंडिगो फ्लाईटमधून प्रवास करतानाचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. धोनीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये धोनीच्या साधेपणाने चाहत्यांची मनं जिंकलीच पण, हा व्हिडीओ आणखी एका कारणामुळे चर्चेत आला. फ्लाईटमध्ये धोनी टॅबवर गेम खेळताना नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि चाहत्यांनाही हा गेम खेळण्याचा मोह आवरता आला नाही. यामुळे गेम कंपनीचा मात्र मोठा फायदा झाला.

फ्लाईटमध्ये ‘हा’ गेम खेळताना दिसला धोनी

जगभरात असे अनेक खेळाडू आहेत जे लक्झरी लाईफस्टाईल जगतात आणि प्रवासासाठी खाजगी जेट किंवा बिझनेस क्लासमध्ये प्रवास करतात, पण चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी अत्यंत साधेपणाने जीवन जगतो. त्याची हीच खासियत चाहत्यांच्या मनात घर करून गेली आहे. धोनीच्या सरळ आणि साधेपणाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. धोनी रविवारी इंडिगोच्या फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना दिसला. या दरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धोनी इकॉनॉमी क्लासमध्ये प्रवास करताना पाहून चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं.

पाहा धोनीचा व्हायरल व्हिडीओ :

धोनी कँडी क्रश खेळताना दिसला 

पण या फ्लाईटदरम्यान असे काही घडले, जे चाहत्यांच्या नजरेतून चुकलं नाही. धोनी आपल्या टॅबलेटवर आरामात कँडी क्रश खेळत बसला होता, तेव्हा एअर होस्टेस त्याच्याजवळ आली आणि मिठाई आणि चॉकलेट्सचा ट्रे धोनीसमोर ठेवला. यावर धोनीने ओम्नी डेट्सचे पॅकेट उचलले, त्यानंतर एअर होस्टेसही धोनीशी बोलताना दिसली. धोनी आणि एअर होस्टेसच्या संवादाचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या फ्लाईटमध्ये धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी धोनीही दिसत आहे.

काय म्हणाली कंपनी?

धोनीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर, ट्विटरवर कँडी क्रश ट्रेंड होऊ लागला. ट्विटरवर एक ट्वीट व्हायरल होत आहे, या ट्वीटमध्ये मोबाईल गेमिंग ऍप्लिकेशनने दावा केला आहे की, 3 दशलक्षाहून अधिक लोकांनी फक्त तीन तासांमध्ये कँडी क्रश अॅप डाउनलोड केला. ‘कँडी क्रश’च्या ट्विटर पेजने धोनीला गेम ट्रेंड केल्याबद्दल धोनीचे आभार मानले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, ”केवळ तीन तासांत 36 लाख नवीन लोकांनी गेम डाउनलोड केला. यासाठी भारताचा महान क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याचे आभार. तुमच्यामुळेच आम्ही भारतात ट्रेंड करत आहोत.” पण कँडी क्रशचं अधिकृत ट्विटर हँडल @CandyCrushSaga वरून असं कोणतेही ट्विट पोस्ट करण्यात आलेलं नाही.

धोनीमुळे कँडी क्रश गेम पुन्हा एकदा चर्चेत

दरम्यान, @CandyCrushSaga या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी लिहिलं आहे. धोनीमुळ कँडी क्रश गेम पुन्हा एकदा चर्चेत आला. कँडी क्रश 2014-2015 या वर्षातील सर्वात लोकप्रिय गेम होता. या काळात हा गेम खूप लोकप्रिय होता. अनेक लोक बस, मेट्रो किंवा ट्रेनमध्ये कँडी क्रश खेळताना दिसत होते.

 



[ad_2]

Related posts