Diabetes Patients Should Drink These Low Calories High Vitamin C drinks For Control Blood Sugar Naturally; रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कंट्रोल करण्यासाठी मधुमेहाच्या रूग्णांनी प्यावे लो कॅलरी आणि व्हिटॅमिन सी असलेले घरगुती ड्रिंक्स पेये

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नारळ पाणी प्या

नारळ पाणी प्या

नारळ पाणी हे या पृथ्वीवरचे सर्वोत्तम पेय म्हणून घोषित केले तरी हरकत नाही इतके हे उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर नारळ पाणी खूपच जास्त चांगले आहे. पोटॅशियम, इलेक्ट्रोलाइट्स, बी जीवनसत्त्वे, अमीनो ऍसिड इत्यादींसह पोषक तत्वे आणि खनिजांनी समृद्ध असणाऱ्या, नारळाच्या पाण्यात कॅलरीज कमी असतात. रक्तातील साखर नियंत्रित राखण्याव्यतिरिक्त, नारळ पाणी हे पचन, त्वचेचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारते.’
(वाचा :- Vitamin D Food : 206 हाडांवर कॅल्शियम व व्हिटॅमिनची ढाल चढवतात हे 5 पदार्थ, लोखंडासारखी टणक व मजबूत बनतात हाडे)​

ताक प्या

ताक प्या

ताक हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सर्वोत्तम दुग्धजन्य पेय आहे कारण त्यात साखर मिसळण्याची गरज नसाते. त्याची टेस्ट वाढवण्यासाठी त्यात जिरे, आले, धणे इत्यादी मसाले टाकता येतात. असे केल्याने या पेयाचे पौष्टिक मूल्य आणखी वाढते.
(वाचा :- 27,000 रिसर्चमध्ये शास्त्रज्ञांना आढळलं – या 4 गोष्टीमुळे कमी होतो Sperm Count, पुरूषहो ताबडतोब खा हे 4 पदार्थ)​

सातूचे सरबत

सातूचे सरबत

सातूचे सरबत हे भाजलेले हरभरे, जिरे, आले, लाल तिखट, पुदिना आणि काळे मीठ यापासून बनवले जाते. या सर्व गोष्टी रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी ओळखल्या आहेत. अर्थात, काही लोकं यात गुळ देखील घालतात, पण तो न घातलेलाच बरा, कारण त्यात देखील साखर असते.
(वाचा :- गुडघेदुखी व हाडांच्या वेदना या 6 घरगुती उपायांनी होतात चुटकीसरशी छुमंतर, आखडलेल्या पायावर करा हे 6 घरगुती उपाय)​

जवसाचे पाणी

जवसाचे पाणी

जवसाचा जीआय इंडेक्स कमी आहे आणि म्हणूनच मधुमेहाच्या रुग्णांसाठी जवस चांगले मानले जाते. रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासोबतच जवसाच्या पाण्याचे तुमच्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे.
(वाचा :- ही भाजी देते जीवनदान, डायबिटीज, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा, हार्ट अटॅकचा धोका करते कायमचा नष्ट, कॅन्सरपासूनही वाचवते)​

कारल्याचा ज्यूस

कारल्याचा ज्यूस

मधुमेहाच्या रुग्णांना फळांचे रस न पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु हा नियम भाजीपाल्यांच्या रसांना लागू होत नाही. कारल्याचा किंवा दुधीचा रस साखरेच्या रुग्णांसाठी उत्तम आहे. या भाज्यांमध्ये अशी संयुगे असतात जी रक्तातील साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. त्यात फॅट, कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही कमी असते.
(वाचा :- Fruits for Diabetes : पोटात जाताच डायबिटीज व रक्तातील साखरेला मुळापासून दाबून टाकतात ही 5 फळं, लगेच खायला घ्या)​

आवळा ज्यूस

आवळा ज्यूस

मधुमेहाच्या रुग्णांसाठी आवळा हा उत्तम पर्याय आहे. यात कमी GI (ग्लायसेमिक इंडेक्स) देखील आहे आणि व्हिटॅमिन सी देखील भरपूर आहे. आवळ्यामध्ये क्रोमियम हे खनिज असते जे कार्बोहायड्रेट चयापचय नियंत्रित करते. हे इन्सुलिन आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. याशिवाय तुम्ही मेथीचे पाणी, दालचिनीचे पाणी, ग्रीन टी आणि हळदीचे पाणी पिऊ शकता. या सर्व गोष्टी मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.

(वाचा :- Uric Acid चे कट्टर दुश्मन हे 5 स्वस्त पदार्थ, लघवीतून बाहेर फेकतात सर्व घाण, कधीच होत नाही मुतखड व हाडं खिळखिळी)​
टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts