Leshpal Javalge Maharashtra Pune Crime News Friend Attack On His Women Friend At Pune Sadashiv Peth Darshana Pawar Murder Case

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Crime news : पुण्यात आज दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती (Pune Crime news) होता होता राहिली. एमपीएससी करणाऱ्या तरुणीवर तिच्या एमपीएससी करणाऱ्या मित्रानेच कोयत्यानं हल्ला केला. दिवसाढवळ्या पुण्यातील सदाशिव पेठेत हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या हल्ल्यातून तरुणी थोडक्यात बचावली ती एका तरुणामुळेच. एकानं हल्ला केला, तर तिथून जाणाऱ्या दुसऱ्या तरुणानं प्रसंगावधान दाखवत तिचा जीव वाचवला. 

पुण्यातील वर्दीळीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या सदाशिव पेठेत ही घटना घडली. तरुणानं तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला. त्यावेळी हल्ल्यात जखमी झालेली तरुणी जीव मुठीत घेऊन सदाशिव पेठेत पळत सुटली. तिला जीवेमारण्यासाठी हल्लेखोर तरुणही तिच्या मागे पळत होता. आजूबाजूचे लोक मात्र फक्त बघत उभे होते. तिचा बचाव करण्यासाठी कोणीच पुढे जात नव्हतं.  तेवढ्यात तिथून जाणाऱ्या एका तरुणानं प्रसंगावधान दाखवलं आणि हल्लेखोर तरुणाच्या हातातून कोयता हिसकावला. धाडस करुन तरुणीचे प्राण वाचवणाऱ्या तरुणाचं नाव आहे लेशपाल जवळगे. 

एकीकडे उपस्थितांनी बघ्याची भूमिका घेतली. दुसरीकडे मात्र लेशपालनं प्रसंगावधान दाखवत तरुणीचा जीव वाचवला. स्वत:च्या जीवाची तमा न बाळगता पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगेने आज धैर्य दाखवलं नसतं तर आज या तरुणीचा जीव गेला असता आणि पुन्हा एकदा दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असती.

कोण आहे लेशपाल जवळगे?

लेशपाल जवळगे आणि त्याच्या मित्राच्या प्रसंगावधानामुळे आज एका तरुणीचा जीव वाचला. लेशपाल जवळगे हा या प्रकरणात हिरो ठरला. लेशपाल जवळगे हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातल्या आढेगावचा आहे. तो पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करते. त्यानं मेकॅनिकल इंजिनिअरींगचं शिक्षण घेतलं त्यानंतर एक वर्ष नोकरी केली आणि आता तो 2018 पासून पुण्यात MPSC चा अभ्यास करत आहे. त्याचे आई-वडिल आढेगावात शेती करतात. 

कसा होता हल्ल्याचा थरार?

लेशपाल जवळगे रोजचं काम आटपून अभ्यासिकेत निघाला होता. रस्त्यात त्याला एक तरुणी पळताना दिसली. त्यानं मागे पाहिल्यावर एक तरुण तिच्यामागे कोयता घेऊन धावताना दिसला. हा सगळा प्रकार पाहून लेशपालनं आपली बॅग फेकली आणि थेट तरुणीचा बचाव करण्यासाठी धाव घेतली. त्यावेळी तरुणीनं जवळच असलेल्या बेकरीत शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीला पाहून बेकरी मालकानं आपल्या दुकानाचं शटर खाली ओढलं, हे पाहून लेशपालनं त्या ठिकाणी जाऊन तरुणीवर होत असलेला हल्ला वाचवला. हल्लेखोर कोयता उगारुन तरुणीच्या डोक्यावर प्रहार करण्याच्या तयारीत होता. तेवढ्यात लेशपालने थेट या तरुणाचा हात धरला आणि कोयता हिसकावला. त्यानंतर अनेक लोक जमली आणि तरुणीचा जीव वाचवला आणि तरुणाला थेट पोलिसांच्या हवाली केलं. 

ही विकृती कमी झाली पाहिजे : लेशपाल जवळगे

“मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. गावाकडून अनेक मुलं पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. अनेक स्वप्न घेऊन ते आलेले असतात. मात्र अशा घटना पाहून प्रचंड राग येतो. तरुण पीढी शिक्षणाच्या नावाखाली गुन्हेगार होताना दिसत आहे. ही विकृती कमी झाली पाहिजे, तरच मुली सुरक्षित राहतील आणि मुलींनीदेखील मैत्री करताना किंवा त्यांच्या आयुष्यात कोणतंही पाऊल उचलताना एकदा सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. जेणेकरुन या तरुणांच्या मनात भीती निर्माण होईल आणि परिणामी हल्ले किंवा गुन्हे कमी होतील.”, असं लेशपाल जवळगे सांगतो.

प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून हल्ला…

प्रेमाला नकार दिल्याच्या रागातून ही सगळी घटना घडली आहे. दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तेव्हापासून हा तरुण या तरुणीच्या प्रेमात होता. त्यानंतर तरुणीने प्रेमाला नकार दिला. याचा त्याला राग आला. त्यानंतर तरुणीच्या कुटुंबियांनीदेखील तरुणाच्या घरी हा प्रकार सांगितला होता. तरुणाच्या आईने त्याला समजावलंदेखील होतं. मात्र घरापर्यंत माहिती गेल्यानं त्याचा राग अनावर झाला आहे. त्याने थेट तरुणी कॉलेजला जात असताना तिच्यावर हल्ला केला. 

[ad_2]

Related posts