Pune Crime : हत्या, लैंगिक अत्याचार, दरोडे… पुण्यातील गुन्हे थांबणार कधी? पुणेकर म्हणतात…

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p>गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. मंगळवारी एमपीएससीची तयारी करणाऱ्या तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्यानं वार करण्यात आले. सुदैवानं ही तरुणी यातून बचावली, मात्र या हल्ल्याची दृश्यं पाहून अवघा महाराष्ट्र हादरून गेला. एमपीेएससी उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवारची निर्घृण हत्या राहुल हंडोरे या तरुणानं केली. आणखी एका घटनेनं तर पुणेकर चक्रावूनत गेलेत. कारण एका तरुणीनं तिच्या प्रियकराचं अपहरण केलं. पुण्यातील उत्तमनगर परिसरातून या तरुणाचं अपहरण झालं. अखेर गुजरातमधील वापीमधून त्याची सुटका करण्यात आली. प्रेयसीसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मुळात, पुण्यात गुन्हेगारी वाढण्यामागची कारणं काय? प्रचंड लोकसंख्या, अस्ताव्यस्त पसरत चाललेलं शहर, कायद्याची भीती न वाटणे, नकार पचवता न येणे, गुन्हेगारी जगताचं आकर्षण वाटणे, ही यामागची काही संभाव्य कारणं आहेत.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>

[ad_2]

Related posts