[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
भारतीय शेअर बाजाराने आज ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (निफ्टी ५०) आपला जुना सर्वकालिक उच्चांक मागे टाकून नवी उंची गाठली आहे. बुधवारी प्री-ओपन मार्केटमध्ये निफ्टी १८,९०० अंकांवर खुला झाला.
यापूर्वी निफ्टीचा सार्वकालिक उच्चांक १८,८८७.६० अंक होता. निफ्टीने सुमारे १४२ सत्रांनंतर नवीन इतिहास रचला आहे. निफ्टीने यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये १८,८८७ अंकांची सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली होती.
देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात जोरदार तेजीने झाली आहे. १ डिसेंबर २०२२ नंतर निफ्टी नवीन उच्चांकावर खुला झाला. तर बीएसई सेन्सेक्सने ६३,७०० अंकांच्या पुढे व्यवहार करण्यास सुरुवात केली आणि विक्रमी उच्चांक गाठण्यात यशस्वी झाला.
विशेष म्हणजे गेल्या काही सत्रांपासून निफ्टी सातत्याने उच्चांकी पातळीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता, पण आज अखेर निफ्टीने मागील सर्व विक्रम मोडीत काढत नवीन शिखर गाठले आहे. दरम्यान, स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकात मोठी तेजी पाहायला मिळत आहे.
[ad_2]