5 तासांत फक्त 40 रुपये मिळाले, रिक्षाचालकाला अश्रू अनावर; VIDEO तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video: आपलं काम कोणतंही असलं तरी दिवसाच्या किंवा महिन्याच्या शेवटी त्याचा योग्य मोबदला मिळाला नाही तर होणारं दु:ख हे समान असतं. मग तुम्ही एखाद्या कंपनीत उच्चपदावर असा किंवा मग मजुरीचं काम करत असा. जेव्हा मेहनत करुनही आपल्या खिशात पैसा येत नाही तेव्हा येणारी हतबलता जीवघेणी असते. हीच हतबलता दाखवणारी एक घटना सध्या चर्चेत आहे. एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो आपली व्यथा मांडत आहे. आपली व्यथा मांडताना त्याला आपले अश्रू थांबवता येत नव्हते. 

सोशल मीडियावर बंगळुरुमधील एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये कमी पैसे मिळत असल्याने रिक्षाचालक रडत असल्याचं दिसत आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारने मोफत बस प्रवास सुविधा सुरु केली असल्याने हा रिक्षाचालक व्यथित झाल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान या व्हिडीओची सत्यता पडताळण्यात आलेली नाही. 

दरम्यान या व्हिडीओनंतर ट्विटरला मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. काहीजण मेहनत घेणाऱ्या या रिक्षाचालकाप्रती संवेदशीलता व्यक्त करत आहेत. तर काहीजण रिक्षाचालक अनेकदा भाड्याच्या नावाखाली जास्त पैसे उकळतात असा आरोप करत आहेत. 

कन्नडामधील स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना रिक्षाचालक आपण सकाळपासून किती कमाई केली हे दाखवत आहे. ट्विटमध्ये सांगितलं आहे, त्यानुसार सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत त्याने फक्त 40 रुपये कमावले आहेत. 

दरम्यान, हा व्हिडीओ कधी रेकॉर्ड केला आहे त्याची जागा, वेळ अशी सविस्तर माहिती उपलब्ध नाही. हा 1 मिनिटांचा व्हिडीओ ट्विटरला अनेकांचं लक्ष वेधून घेत असून, त्यावर दोन गट पडले आहेत.

एका युजरने म्हटलं आहे की, ‘यांनीच मोफत मिळावं म्हणून मतदान केलं असून, त्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम असतात’. तर एका युजरने शंका उपस्थित करत म्हटलं आहे की ‘कसं काय शक्य आहे? महिलांसाठी मोफत बससेवा आहे. बसमध्ये महिला गर्दी करत आहेत. मग पुरुषांनी काय घरात स्वत:ला बंद करुन घेतलं आहे का’.

‘तरीही मागील एकही आठवड्यात रिक्षाचालक जयदेवा ते मल्लेश्वरमला जाण्यात तयार नव्हता. एकजणही तयार झाला नाही. एकाने तर 200 टक्के भाडं मागितलं. सगळेजण पार्किंगमध्ये रिक्षा लावून आराम करत होते. शेवटी मी बस पकडली. यांच्यासाठी मला अजिताब दया नाही. उबर, ओला तर लुटत आहेत,’ असं एका युजरने लिहिलं आहे. 

Related posts