Uproar over bringing a goat to the society for sacrifice in society at mira road

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मीरा रोडमधील (Mira Road News) एक हायफाय सोसायटीत बकरी ईदला (Bakari Eid) कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरुन वाद झाल्याची घटना मुंबईतील एका सोसायटीत घडली आहे.

बकरी ईदनिमित्त दोन बकरे आणण्यात आले होते. हा प्रकार समाजातील लोकांना कळताच लोकांनी एकच गोंधळ घातला. यासोबतच लोकांनी सोसायटीच्या आवारात हनुमान चालिसा पठण केलं. काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जेपी इन्फ्रा या उच्चभ्रू सोसायटीत हा प्रकार घडला. अखेर पोलिसांच्या मदतीने वाद मिटवण्यात आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोसायटीत राहणारे मोहसीन शेख यांनी बकरी ईदनिमित्त सोसायटीत दोन बकरे आणले होते. ही बाब सोसायटीत समजल्यानंतर सोसायटीतील काही लोकांनी सोसायटीत एकत्र येत निषेध केला. बकऱ्याला बाहेर काढा अशी सोसायटीतील लोकांनी मागणी सुरु झाली. या गदारोळात लोकांनी हनुमान चालिसाचा पाठणही सुरू केले  आणि जय श्री रामच्या घोषणा ही दिल्या.

काशिमीरा पोलिसांना याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचू  वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. तेथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. डीसीपी जयंत बजबळे यांनी  लोकांची समजूत काढली आणि राग शांत केला. यात सोसायटीतील लोक आणि पोलिसांमध्ये थोडी बाचाबाची ही झाली. 

बकरी घेऊन आलेल्या मोहसीनच्या म्हणण्यानुसार, या सोसायटीत 200 ते 250 मुस्लिम कुटुंब राहतात. दरवर्षी बिल्डर आम्हाला बकरी ठेवण्यासाठी जागा देतो, पण यावेळी बिल्डरने सांगितले की आमच्याकडे जागा नाही, यासाठी तुमच्या सोसायटीशी बोला. 

मोहसीनच्या म्हणण्यानुसार त्यांनी सोसायटीकडे बकरी ठेवण्यासाठी जागा मागितली होती, पण सोसायटीने जागा दिली नाही. म्हणून मोहसीनने मंगळवारी पहाटे दोन बकऱ्या आणल्या. आम्ही सोसायटीत कधीच कुर्बानी देत नाही, आम्ही नेहमी कत्तलखान्यात किंवा बकऱ्यांच्या दुकानात बकऱ्याची कुर्बानी देतो, असं मोहसिनने सांगितलं आहे. तसेच जमलेल्या जमावाने गैरवर्तणूक आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मोहसीनने केला आहे. सोसायटीतील लोकांनी माञ सोसायटीत बकरी आणू शकत नाही, कुर्बानी देऊ शकत नाही असे सांगितले आहे.

 


हेही वाचा

[ad_2]

Related posts