Ashadhi Ekadashi 2023 Fasting Tips and Rules what to eat and what to avoid; आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावे काय टाळावे, पित्त आणि डोकेदुखीचा अजिबात त्रास होणार नाही

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​तळलेले पदार्थ टाळा

​तळलेले पदार्थ टाळा

आषाढी एकादशीच्या दिवशी बटाटे किंवा साबुदाण्याचे पापड यासारखे पदार्थ खाणे टाळा. कारण उपवासाच्या दिवशी अगोदरच पित्त थोडं खवळलेलं असतं अशावेळी तेलकट पदार्थ खाल्ले तर त्रास होतो. तळलेल्या पदार्थांमुळे अपचन, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी, पित्त उसळणे यासारख्या शारीरिक गोष्टींचा त्रास होतो. त्यामुळे डोकेदुखी देखील डोकं वर करू शकते. अशावेळी हे सगळं टाळा.

​साबुदाणा खिचडी

​साबुदाणा खिचडी

साबुदाणा खिचडी उपवासाच्या दिवशी खाल्ल्याने तुम्हाला पित्त उसळणे किंवा डोकेदुखी होऊ शकते. कारण साबुदाणि पचनास कठीण असतो तसेच शेंगदाण्यामुळे देखील पित्त उसळते अशावेळी साबुदाण्याची खिचडी खाणे टाळा

​सुकामेवा खा

​सुकामेवा खा

सुकामेवा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. उपवासाच्या दिवसांमध्ये डोके दुखू नये असं वाटत असेल तर सुकामेव्याचं सेवन करा. कारण यामुळे शरीराला ताकदही मिळते आणि पौष्टिक पदार्थ खाल्ल्यामुळे फायदा देखील होतो.

​कांदा-लसूण टाळा

​कांदा-लसूण टाळा

कांदा-लसूण शरीरासाठी चांगला असला तरीही त्याचे उपवासाच्या दिवशी सेवन करणे चांगले नाही. यामुळे अपचन होण्याची शक्यता असते. तसेच मळमळ होऊ शकते. त्यामुळे कांदा, लसूणचा वापर टाळा.
​(वाचा – ऋजुता दिवेकरने सांगितलेल्या 4S च्या मदतीने करा एक्सरसाइज, १०० टक्के रिझल्ट मिळालाच म्हणून समजा)​

चहा-कॉफी टाळा

चहा-कॉफी टाळा

अनेकदा उपवासाच्या दिवशी चहा-कॉफीचे प्रमाण वाढवले जाते. पण हे आरोग्यासाठी पूर्णपणे घातक आहे. कारण यामध्ये असलेल्या कॅफिनमुळे शरीरातील पित्त वाढतं. यामुळे मळमळ होऊ शकते. उपवास करताना वरील गोष्टी लक्षात ठेवल्यास उपवास अधिक सुखकर होईल.

​फळांचे सेवन करा

​फळांचे सेवन करा

उपवासाच्या दिवशी किंवा इतर एखादा दिवस हा फक्त फळांचा वार असणे गरजेचे आहे. या दिवसांमध्ये तुम्ही फक्त ताज्या आणि हंगामी फळांचे सेवन करा. यामुळे एक प्रकारे तुमचं शरीर डिटॉक्स होईल. या दिवसांत कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहण्यासही मदत होतो.

​(वाचा – Tamannaah Bhaita ने सांगितले हे Detox Drink, लिव्हरची एकन् एक नस साफ होईल, शरीर होईल हलकं)​

[ad_2]

Related posts