Special Olympics World Games Berlin 2023 Pm Modi Praises Athletes Who Won Medals In Berlin Special Olympics

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Special Olympics World Games Berlin 2023: बर्लिन स्पेशल ऑलिम्पिक समर गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत 76 सुवर्ण पदकांसह 202 इतर पदकं जिंकणाऱ्या खेळाडूंचं पंतप्रधानांनी (PM Modi) अभिनंदन केलं आहे. उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सर्व खेळाडूंचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून या सर्व खेळाडूंचं अभिनंदन केले आहे.

स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स ही जगातील सर्वात मोठी सर्वसमावेशक क्रीडा स्पर्धा आहे, जी खास दिव्यांगांसाठी आयोजित केली जाते. यामध्ये हजारो दिव्यांग खेळाडू सहभागी होतात. 17 ते 25 जून 2023 या कालावधीत विशेष ऑलिम्पिक जागतिक खेळ बर्लिन येथे पार पडला आणि प्रथमच जर्मनीमध्ये देखील हा खेळ खेळवण्यात आला, यामध्ये 76 सुवर्ण पदकांसह एकूण 202 पदकं भारतीय खेळाडूंनी जिंकले. भारतासाठी खेळणाऱ्या या सर्व खेळाडूंनी देशाचं नाव उंचावलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, “बर्लिनमधील स्पेशल ऑलिम्पिक समर गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि 76 सुवर्ण पदकांसह 202 पदकं जिंकणाऱ्या भारताच्या अतुलनीय खेळाडूंचं अभिनंदन. त्यांच्या यशामध्ये आम्ही सर्वसमावेशकतेची भावना साजरी करतो आणि या उल्लेखनीय खेळाडूंच्या चिकाटीचं कौतुक करतो.”

भारताने स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स 2023 चा शेवटचा दिवस त्यांच्या पदकांची संख्या 202 पर्यंत नेऊन पूर्ण केला. बर्लिनमध्ये शहराच्या मध्यभागी असलेल्या ब्रँडेनबर्ग गेटवर या सर्व खेळाडूंचा पारितोषिक वितरण उत्साहात पार पडला. भारताने या खेळात 76 सुवर्ण, 75 रौप्य आणि 51 कांस्यपदकांसह शेवटची पदकं अॅथलेटिक्स ट्रॅकमधून मिळवली आहेच. भारतीय खेळाडूंनी ट्रॅक इव्हेंटमधून (2 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य) सहा पदकं मिळविली आहेत.

सुवर्णपदक विजेत्या आंचल गोयल (400 मी, लेव्हल बी महिला) आणि रविमथी अरुमुगम (400 मी, लेव्हल सी महिला) यांचं सर्वांनीच कौतुक केलं. पोडियमवर अव्वल स्थान मिळवत या दोघांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. जगभरातील खेळाडूंनी त्या दोघींचं अभिनंदन केलं.

पदकाच्या रंगावरुन खेळाडूंच्या कामगिरीबद्दल बोलणं चुकीचं ठरेल, कापण सर्वच पदक विजेत्यांनी या खेळात मोलाचे योगदान दर्शवले. खेळाडू साकेत कुंडू, ज्याने याआधी मिनी भालाफेक लेव्हल बी मध्ये रौप्य पदक पटकावलं होतं, त्याने यावेळी लेव्हल बी 400 मी मध्ये कांस्यपदक जिंकलं आणि ट्रॅक आणि फील्डमध्ये मिळून एक दुर्मिळ दुहेरी कामगिरी बजावली.

हेही वाचा:

Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता; किती दिवस चालणार अधिवेशन?



[ad_2]

Related posts