Imd warns of heavy to very heavy rainfall in six maharashtra districts less intense rains in mumbai on thursday

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबईत पुढील ४८ तासांपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान विभागाने ट्विट केले आहे की, “मुंबईच्या रडारच्या संलग्न प्रतिमेत दाखवल्याप्रमाणे काल दुपारपासून मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. पुढील ४८ तासांत तो कायम राहण्याची शक्यता आहे. गेल्या 21 तासांत काही ठिकाणी अत्यंत मुसळधार आणि काही ठिकाणी खूप मुसळधार पाऊस झाला आहे.”

कोकण किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या चारही जिल्ह्यात हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

राज्यातला गेल्या 7 दिवसातला पाऊस चांगला झाला आहे. गेल्या काही दिवसात चांगला पाऊस झाला असला तरी अजूनही अनेक जिल्ह्यांत पाऊस सरासरी पेक्षा खूप कमी आहे. IMD च्या अंदाज नुसार राज्यात येत्या काही दिवस पाऊस सक्रिय राहील. राज्यात आजही मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार आहे, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

मुंबईत पावसाचा जोर

मुंबईसह उपनगरात काल दिवसभर पाऊस पडल्यानंतर आज सकाळपासून पाऊस थांबला. बुधवारच्या पावसानंतर मुंबई उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचले होते. पण आज प्रशासन आणि महापालिकेचे कर्मचारीही सतर्क झाले आहेत.

झाड पडण्याच्या घटना वाढल्या

मुंबईच्या भायखळ्यात मध्यरात्री अडीचच्या सुमारास झाड पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्यरात्री भायखळा इंदू ऑइल मिल कंपाउंडमध्ये पाच ते सहा जण झोपले होते. रात्री अडीचच्या सुमारास एक झाड खाली पडल्यामुळे रहमान खान वय 22 वर्ष याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर त्याच्या साथीदार रिजवान खान 20 वर्ष गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जे जे रुग्णालय मध्ये उपचार सुरू आहेत.

मालाड आणि गोरेगावमध्येही झाड पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मालाडमध्ये झाड पडल्याने एकाचा मृत्यू झाला तर गोरेगावमध्ये झाड पडल्याने दोन जण जखमी झाले. 


हेही वाचा



[ad_2]

Related posts