Maharashtra Rain Updates News Rainfall In Many Parts Of The Maharashtra Imd

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Maharashtra Rain : राज्याच्या काही भागात पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. काही भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे, तर कुठे अद्यापही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मुंबईत गेल्या चार दिवसापासून सुरु असलेला पावसाचा जोर काही प्रमाणात कमी आला आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज कोकण विभागात काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट दे्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही जोरदार पावासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 

कल्याण डोंबिवलीध्ये जोरदार पाऊस

हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात पाऊस सुरु आहे. 
काल काही प्रमाणात कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं आहे. 

बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याला मोठा प्रवाह

मागील २४ तासातील मुसळधार पावसानं बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याचा प्रवाह वाढला आहे. 
या धबधब्याने रौद्ररुप धारण केलं असून, धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी करत आहेत. 
काल आषाढी एकादशी तसेच बकरी ईदच्या सुट्ट्यांमुळं पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती.  
जून महिना सरताना पावसाची सुरुवात झाली असून गेली चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्यटकांनी कोंडेश्वर धबधब्यावर मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत. पर्यटक या बदलत्या निसर्गाचा मनमुराद आनंद घेत आहेत. कोंडेश्वर मंदिराचा बाजूला दोन धबधबे असून दरवर्षी पावसाळ्यात या धबधब्याला मोठा प्रवाह असतो. म्हणून पर्यटकांनी सुद्धा कोंडेश्वर धबधब्याला पसंती दिली आहे.

ठाणे शहरात पावसाचा वेग मंदावला

मागील दोन ते तीन दिवस ठाणे जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली. मात्र, सध्या काही प्रमाणात पावसाचा वेग मंदावला आहे. ठाणे शहरात झाड पडणे स्लॅब कोसळणे  अशा घटना घडल्या आहेत.

मुंबईतील कांदिवली पूर्वेमध्ये बाथरूमच्या स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू

मुंबईत सुरु असलेला मुसळधार पावसामुळे कांदिवली पूर्वेमधील अशोकनगर परिसरात बाथरुमचा स्लॅब एका घरावर कोसळून 35 वर्षाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. काल रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. किशन धुला असे त्यांचे नाव आहे. अशोक नगर परिसरात आपल्या घरामध्ये असताना बाथरुमचा स्लॅब त्यांच्या घरावर कोसळून त्यांचा मृत्यू झाला. 

 राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतिक्षा कायम

दरम्यान, राज्यातील अनेक भागात पावसाची प्रतिक्षा कायम आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच पश्चिम महाराष्ट्कातील काही जिल्ह्यात अद्याप पावसानं हजेरी लावली नाही. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

Bhiwandi Rain: भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला

[ad_2]

Related posts