[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारला आज एक वर्षं पूर्ण होतंय. गेल्या वर्षी 30 जून रोजी शिंदे आणि फडणवीसांनी अनुक्रमे मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 20 ते 30 जून 2022 या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. 29 जून रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
उद्धव ठाकरेंचा राजीनामा
एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिवसेना पक्षासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात लढाई झाली, निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला.
आमदार गुवाहाटीवरून गोव्याकडे
20 जून 2022 रोजी महाराष्ट्रात विधानपरिषदेची निवडणूक झाली, त्याच रात्री शिंदे आणि आमदार सुरतच्या दिशेनं रवाना झाले होते. पहाटेच्या सुमारास एकनाथ शिंदे हे 16 आमदारांसह संपर्काबाहेर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. शिवसेनेच्या 40 आमदारांसह 52 आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सूरत आणि तेथून गुवाहाटीला रवाना झाले होते. 29 जून रोजी एकनाथ शिंदेसोबत गेलेले आमदार गुवाहाटीवरून गोव्याकडे गेले. त्यानंतर 30 जून रोजी समर्थक आमदारांना गोव्यातच ठेवून एकनाथ शिंदे प्रमुख आमदारांसह मुंबईकडे रवाना झाले.
फडणवीसांची ‘ती’ पत्रकार परिषद राजकरणातील ट्विस्ट
उद्धव ठाकेरेंनी राजीनामा दिल्याने बहुमत चाचणी झाली नाही. राजभवनावर छोटेखनानी शपथविधीचा कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची घोषणा केली. स्वत: सत्तेच्या बाहेर राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यावेळी सर्वांना मोठा धक्का बसला. पण पुढच्या तासाभरातच पक्षश्रेष्ठींच्या देशानंतर देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले.
बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते
एकनाथ शिंदे म्हणजे कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केलं.
हे ही वाचा :
Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चेची शक्यता
[ad_2]