अंबाती रायुडूचे राजकारणात पदार्पण, राजकीय कारकीर्द सुरु करण्यामागचा काय आहे उद्देश; जाणून घ्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाचवे विजेतेपद पटकावण्यास मदत करून इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून नुकतीच निवृत्ती घेतलेला भारतीय क्रिकेटपटू अंबाती रायडूला आंध्र प्रदेशच्या राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा आहे. ३७ वर्षीय रायडू यांनी राज्यातील जनतेची सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यांनी राजकारणात येण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे.

“लोकांची सेवा करण्यासाठी, मी लवकरच आंध्र प्रदेशात निवडणूक लढवणार आहे,” असे रायडू यांनी आयएएनएसला सांगितले. याआधी मी जिल्ह्यातील अनेक भागांना भेटी देऊन लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. रायडूने यापूर्वी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी त्यांच्या कार्यालयात जात त्यांची भेट घेतली होती, त्यांच्या युवाजन श्रमिक रायथू काँग्रेस पार्टी (YSRCP) सोबतच्या त्यांच्या संभाव्य संबंधाविषयी अनेक चर्चाही होत होत्या.
काही दिवसांपूर्वी गुंटूर जिल्ह्यातील मुतालुरूच्या भेटीदरम्यान, ३७ वर्षीय क्रिकेटपटूने पत्रकारांना सांगितले की, आंध्र प्रदेशातील लोकांची सेवा करण्यासाठी मला राजकारणात प्रवेश करायचा आहे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यासाठी आपण गुंटूर जिल्ह्याचा दौरा करत असल्याचे त्यांनी सांगितले. मी कोणते प्लॅटफॉर्म निवडणार हे मी लवकरच सांगेन, असेही तो पुढे म्हणाला.

उजव्या हाताच्या या फलंदाजाने आपला राजकीय कल उघड केला नसला तरी, रेड्डी यांच्या भेटीमुळे अफवांना खतपाणी मिळाले. याशिवाय रायुडूला काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेले माजी भारतीय क्रिकेट कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन यांचा पाठिंबा मिळाला आहे. अझरुद्दीन हे हैदराबादजवळील शहरी मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून रायडूच्या उमेदवारीला पाठिंबा देत असल्याची माहिती आहे. अझरुद्दीन यांनीही रायुडूच्या निवडणूक जिंकण्याच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला.

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

[ad_2]

Related posts