चाळीशीनंतर महिलांना हाडेदुखी आणि हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो, बाबा रामदेव यांच्या टिप्स

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

​चाळीशीनंतर जाणवतो मोठा त्रास

​चाळीशीनंतर जाणवतो मोठा त्रास

या वयात सर्वात मोठा बदल हा हाडांच्या आरोग्यावर होतो. महिलांच्या शरीरात या वयात कॅल्शियम आणि विटामिन डीची कमतरता खूप जाणवते. ज्याचा थेट परिणाम हाडांवर होत असतो. तसेच महिलांना या वयात हाडांना सूज येणे, आणि अंगदुखीचा त्रास सर्वाधिक प्रमाणात जाणवतो. तसेच हार्मोनल बदल होत असल्याचा परिणाम शरीरावर तसेच मनावरही होतो. अशावेळी योगगुरू बाबा रामदेव यांनी सांगितलेले खास टिप्स नक्कीच मदत करतील.

​(वाचा – १६ वर्षांच्या मुलाला प्रोटीन शेक पिणं पडलं भारी, ३ दिवसांतच झाला मृत्यू)​

​शतावर चूर्णाचे करावे सेवन

​शतावर चूर्णाचे करावे सेवन

जर वाढत्या वयानुसार हाडांमध्ये दुखणे, कंबरदुखी किंवा मानेचा त्रास होत असेल तर शतावर चूर्ण गुणकारी आहे. शतावर चूर्णामुळे गॅस्ट्रिक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच यामुळे रजोनिवृत्ती दरम्यानही मदत होते. या वयात होणाऱ्या हार्मोनल बदलांच्या लक्षणांना कंट्रोल ठेवण्यासाठी याचा फायदा होतो. उशिरा गर्भधारणा राहिली असल्यास शतावरीचे सेवन करावे. तसेच युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शनमध्येही याचा फायदा होतो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या त्रासापासूनही मुक्तता मिळते.

(वाचा – Uric Acidवर औषधंही नाही तर हिरव्या भाजीचा ज्यूस करेल १०० टक्के काम, सांधेदुखी होईल छुमंतर)

खरू आणि गिलोयचे सेवन

खरू आणि गिलोयचे सेवन

वाढत्या वयानुसार महिलांमध्ये लघवीच्या समस्या जाणवतात. सतत लघवीला होण्यावर गिलोय आणि गोखरूचे सेवन करणे फायदेशीर असते. या दोन्ही आयुर्वेदिक औषधामुळे लघवीची समस्या, मुतखड्याचा त्रास आणि किडनीशीसंबंध सर्व आजार दूर होतात.

तीन योगासनांचा होतो फायदा

तीन योगासनांचा होतो फायदा

चाळीशीनंतर महिलांनी विपरीतकर्णी आसन, पर्वतासन आणि सुप्त वक्रासन करावे. विपरीतकर्णी आसनामुळे प्रजनन क्षमता सुधारते आणि ब्लड सर्क्युलेशन उत्तम होण्यास मदत होते. यामुळे हार्मोनल बदलामुळे होणाऱ्या समस्या दूर होतात. सुप्त वक्रासन केल्यामुळे शरीरातील मसल्सची एक्सरसाइज होती. पाठ आणि पोटाचे मसल्स यामुळे चांगले होतात हाडे देखील मजबूत होतात.

​(वाचा – Weight Loss Story : लठ्ठपणामुळे गमावला होता आत्मविश्वास, ८ महिन्यात कमी केलं २७ किलो वजन)​

​डाएटमध्ये करा बदल

​डाएटमध्ये करा बदल

वाढत्या वयानुसार शरीरात होणारे बदल आणि त्रास यापासून वाचण्यासाठी डाएटमद्ये बदल करणे अत्यंत गरजेचे असते. महत्वाचं या वयात जंकफूड्सपासून अंतर ठेवा. या वयात कोलेस्ट्रॉल, डायबिटिस आणि हाय बीपीची त्रास जाणवतो. अशावेळी मीठ आणि साखरेचं सेवन कमी करावे. तसेच आहारात हिरव्या भाज्या आणि सिझनची फळे खावीत.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts