जोस बटलर इंग्लंडसोबतचं सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट मोडणार? राजस्थान रॉयल्स आहे सर्वात मोठे कारण

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लंडन: इंडियन प्रीमियर लीगमधील संघ खेळाडूंसोबत काही करार करणार असल्याची माहिती मागे एकदा समोर आली होती. आता आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा संघ आता असा एक करार करणार असायची बातमी समोर येत आहे. राजस्थान रॉयल्स इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलरसोबत एक आकर्षक करार करणार आहे. ब्रिटिश वृत्तपत्र ‘टेलिग्राफ’ने गुरुवारी ही माहिती दिली. आयपीएलच्या बहुतेक संघांची जगभरातील टी-२० लीगमध्ये एक ना एक प्रकारे भागीदारी आहे. अशा स्थितीत जगातील अव्वल आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आपल्या देशासोबतचा केंद्रीय करार सोडून फुटबॉलप्रमाणे फ्रँचायझी क्लबशी करार करतील, असा धोका आहे.

टेलिग्राफने म्हटले आहे की, राजस्थान रॉयल्स बटलरला दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी करण्यास उत्सुक आहे परंतु अद्याप त्यांनी प्रस्ताव दिलेला नाही आणि तो या करारास सहमत होईल की नाही हे निश्चित नाही. अहवालात म्हटले आहे की, ‘इंग्लंडचा मर्यादित षटकांचा कर्णधार जोस बटलरला इंडियन प्रीमियर लीग (IPL) संघ राजस्थान रॉयल्स (RR) ने चार वर्षांच्या कराराची ऑफर दिली आहे. ही ऑफर अद्याप औपचारिकरित्या देण्यात आली नसल्याचे समजते. विश्वचषक विजेता कर्णधार ही ऑफर स्वीकारतो की नाही हे पाहावे लागेल.

टी-२० मध्ये २० षटके फलंदाजी; जोस बटलरचा जलवा सुरूच

२०१८ मध्ये रॉयल्सच्या संघात सामील झाल्यापासून बटलरने ७१ सामन्यांमध्ये १८ अर्धशतके आणि ५ शतके झळकावली आहेत. तो दक्षिण आफ्रिका टी-२० लीगमध्ये रॉयल्सच्या पार्ल रॉयल्स संघाकडूनही खेळतो. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने इंग्लंडच्या जेसन रॉयला अशाच पद्धतीने संघात सामील करून घेतले आहे. मात्र, जेसन रॉयचा इंग्लंड क्रिकेट संघासोबत केंद्रीय करार नव्हता.

जोस बटलरने हे केले तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा निर्णय घेणारा तो पहिला खेळाडू ठरेल. यापूर्वी ट्रेंट बोल्टने फ्रँचायझी क्रिकेटसाठी केंद्रीय करार घेण्यास नकार दिला होता. तो फक्त मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंडकडून खेळतो. याबाबत अनेक तज्ज्ञांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोकादायक असल्याचे बहुतेकांचे मत आहे.

[ad_2]

Related posts