Ishant Sharma Can Comeback in Team India After Fantastic Performance In IPL 2023; अजिंक्य रहाणेनंतर या दमदार खेळाडूचं नशीब पालटणार? टीम इंडियामध्ये परतू शकतो ३४ वर्षीय गोलंदाज

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: आयपीएल ही देखील एक अद्भुत स्पर्धा आहे. अनेक युवा खेळाडूंसाठी ही स्पर्धा एक दमदार प्लॅटफॉर्म आहे तर वेळेस दिग्गज खेळाडू मात्र यात मागे पडतात. राष्ट्रीय संघातून बाहेर पडलेल्या खेळाडूंसाठी एक पुनरागमन करण्याचं मोठं प्लॅटफॉर्मही हे आहे असे म्हणता येईल. आता अजिंक्य रहाणेकडे बघा. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३ च्या विजेतेपदासाठी तो टीम इंडियामध्ये परतला. दुसरीकडे, एक धाकड गोलंदाज यंदाच्या आयपीएलमधून आपल्या परतीचे संकेत त्याने सिलेक्टर्सला दिले आहेत.दिल्ली कॅपिटल्सचा संघ सुरुवातीच्या सामन्यांमध्ये पराभव पाहत होता. पण त्यांच्याकडे भारतीय क्रिकेट संघाचा एक हुकुमी एक्का होता आणि त्यांनी या खेळाडूला संघात घेताच दिल्लीच्या संघाची ताकद कैकपटीने वाढल्याचे पाहायला मिळाले. त्याच्यामुळे संघाची गोलंदाजी बाजू अधिक मजबूत झाली. हा गोलंदाज म्हणजे टीम इंडियाचा इशांत शर्मा.

IPL मधील कामगिरी

आयपीएल २०२३ मधील कामगिरीबद्दल बोलताना, इशांतने समीक्षकांच्या अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. त्याने ८ सामन्यात १० विकेट घेतल्या आहेत, परंतु या कालावधीत त्याचा इकॉनॉमी रेट ८.२४ आहे, जो चेन्नईचा स्टार गोलंदाज तुषार देशपांडे (९.७९) आणि १९ विकेट घेणारा अर्शदीप सिंग (९.६७) यांच्यापेक्षा खूपच चांगला आहे.

पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या शेवटच्या दोन्ही सामन्यांमध्ये इशांत शर्माने जबरदस्त कामगिरी केली. त्याने दोन्ही सामन्यात संघाचा कर्णधार शिखर धवनला बाद केले आणि २ विकेट घेतले. धरमशाला येथे झालेल्या सामन्यात इशांतने शेवटचे षटक टाकून संघाला विजय मिळवून दिला. तत्पूर्वी, गुजरात टायटन्सविरुद्ध शेवटचे षटक टाकताना संघाने ५ धावांनी विजय मिळवला.


इशांत शर्माबाबत टीम इंडियाची धारणा वेगळी आहे. निवडकर्ते त्याला कसोटीसाठी तंदुरुस्त मानत नाहीत, तसेच संघ निवडीदरम्यान त्याच्या नावाची चर्चाही होत नाही. अशा स्थितीत आयपीएलमधील दमदार कामगिरीमुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा तरी संपुष्टात आली आहे. वयाच्या ३४ व्या वर्षी तो टीम इंडियात पुनरागमन करू शकतो. त्याच्या चेंडूंमध्ये अजूनही तितकीच ताकद आहे, जी त्याला भारतासाठी पुन्हा खेळवू शकते.

राजस्थान आणि बंगळुरुच्या लढतीत शेवटला एंट्री, या तरुणीने एक बोली लावली आणि विषयच संपवला

इंटरनॅशनल करियर

१०० पेक्षा जास्त कसोटी खेळलेल्या काही भारतीय वेगवान गोलंदाजांपैकी इशांत शर्मा एक आहे. त्याने १०५ कसोटीत ३११ विकेट घेतले आहेत, तर ८० एकदिवसीय सामन्यांमध्ये ११५ विकेट घेतले आहेत. त्‍याच्‍या नावावर टी-२० इंटरनॅशनलमध्‍ये ८ विकेट आहेत.



[ad_2]

Related posts