Indian Origin Women Sonal Kale Became Mrs Asia GB Finalist In London

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mrs Asia GB : अनेक भारतीय वंशाचे लोक परदेशात जाऊन विविध क्षेत्रात काम करत असतात. अशीच एक भारतीय वंशाची महिला Mrs Asia GB या  सौंदर्य स्पर्धेची फायनलिस्ट ठरली आहे.  सोनल काळे  (Sonal Kale) ही लंडनमध्ये (London) स्थायिक झालेली भारतीय वंशाची महिला आहे. ती  Mrs Asia GB या  सौंदर्य स्पर्धेच्या पहिल्या सीझनची फायनलिस्ट ठरली आहे. ही सौंदर्य स्पर्धा aglp एंटरप्राइजेसद्वारे आयोजित केली गेली आहे. जाणून घेऊयात Mrs Asia GB  या स्पर्धेची फायनलिस्ट सोनल काळे हिच्याबद्दल…

सोनलचा जन्म महाराष्ट्रीयन कुटुंबात झाला.  सोनल ही तिच्या उच्च शिक्षणासाठी लंडनला गेली. त्यानंतर तिनं लंडनमधील एका गुजराती व्यक्तीसोबत लग्न केले. सोनल ही  एक इन्फ्लुएंसर, फ्रीस्टाइल बॉलिवूड कोरिओग्राफर आणि कंटेन्ट क्रिएटर देखील आहे. सोनलचे आई-वडील मुंबईत राहत आहेत. सोनल  Mrs Asia GB  या स्पर्धेची फायनलिस्ट ठरल्यानं तिच्या आई-वडिलांना आपल्या मुलीचा अभिमान वाटत आहे. 

सोनलनं एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून तिच्याबद्दल माहिती दिली. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, ‘मी जन्माने भारतीय, मनाने महाराष्ट्रीयन, वास्तव्याने ब्रिटिश (14 वर्षे) आहे. मी लग्न झाल्यानंतर  गुजराती झाले. त्यामुळे मी महाराष्ट्रीयन आणि गुजराती या  दोन्हींमध्ये बॅलेन्स ठेवते.  Mrs Asia GB या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा माझा उद्देश अधिक आत्मविश्वास मिळवणे हा आहे.  माझ्या नवीन प्रवासात मला अशा लोकांसाठी रोल मॉडेल व्हायचे आहे ज्यांच्यामध्ये नृत्य करण्याचा, स्वतःला व्यक्त करण्याचा आत्मविश्वास नाही.  म्हणून मी येथे मानसिक आरोग्य, प्रेम आणि दयाळूपणा या गोष्टींबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी आले आहे.’


सोनल ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती विविध पोस्ट सोशल मीडियावर शेअर करते. सोनलनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला ‘चायवाली लडकी’  असं नाव दिलं आहे. तिला इन्स्टाग्रामवर 1,713 फॉलोवर्स आहेत. सोनल ही तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Harnaaz Sandhu : मिस युनिव्हर्स सोहळ्यात हरनाज संधूचं अनोखं पाऊल, सुष्मिता सेन अन् लारा दत्ताचा असा केला सन्मान, भावूकही झाली



[ad_2]

Related posts