Buldhana Accident News State Government Has Announced An Aid Of Five Lakhs To The Relatives Of The Deceased CM Eknath Shinde

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Eknath Shinde : बुलढाणा जिल्ह्यात खासगी बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारच्या वतीनं पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. एबीपी माझाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली. 

 जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार 

बुलढाणा जिल्ह्यात झालेली अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुख:द आहे. यामध्ये बसने पेट घेतल्यानं 25 जणांचा मृत्यू झाला आहे. आठ लोक जखमी आहेत. मी याबाबत जिल्ह्याधिकारी तेथील पोलिस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर चांगले उपचार करण्याच्या सूचना मी दिल्या असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जखमी रुग्णांचा खर्च राज्य सरकारच्या वतीनं करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून पाच लाखांची मदत दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. 

 

वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं 

अपघात झाल्यानंतर तात्काळ त्याठिकाणी यंत्रणा दाखल झाल्या होत्या. पण बसने मोठा पेट घेतल्यानं बसमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. समृद्धी महामार्गावर प्रशासन योग्य त्या उपायोजना करत आहे. काही वेळेला वेगावर नियंत्रण नसल्यानेही अपघात होत आहेत. त्यामुळं वाहनचालकांनी देखील वाहन चालवताना काळजी घेणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्री एकाथ शिंदे म्हणाले. 
प्रवाशांना सुरक्षीतस्थळी नेणं ही वाहनचालकांची जबाबदारी असते. त्यामुळं सर्वांनी नियमांचे पालन करणं गरजेचं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. अपघाताला ज्या गोष्टी कारणीभूत आहेत, त्यावर योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अपघात 

बुलढाण्यात (Buldhana) एका प्रवासी बसचा भीषण अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते. यातील आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर हा अपघात झाला आहे. ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याला निघाली होती. त्यावेळी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली.

बस विदर्भ ट्रॅव्हल्सची 

अपघातग्रस्त बस ही नागपूरहून पुण्याकडे जात होती. त्यावळेळी हा अपघात घडला. या बसमध्ये नागपूर, वर्धा, आणि यवतमाळचे प्रवासी होते. ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. ही बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावालगत समृध्दी महामार्गावर रस्ता दुभाजकाला धडकली आणि त्यानंतर बसने पेट घेतला. डिझेलच्या संपर्कात आल्याने बसने वेगाने पेट घेतला. त्यानंतर बसमध्ये असणाऱ्या 33 प्रवाशांपैकी आठ प्रवासी सुखरुप बाहेर पडले. तर 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. सुखरुप बाहेर पडलेल्यांमध्ये चालक आणि वाहकाचा समावेश आहे. दरम्यान, जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं आहे. यातील बहुतांश प्रवाशी हे नागपूर, वर्धा आणि यवतमाळचे आहेत.  

महत्त्वाच्या बातम्या:

Buldhana Accident : बुलढाण्यात प्रवासी बसचा भीषण अपघात, 25 प्रवाशांचा जागीच मृत्यू 

 



[ad_2]

Related posts