[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Karnataka Government Formation: कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा तिढा आता सुटला असून मुख्यमंत्रीपदी सिद्धारमय्या यांचे नाव अंतिम करण्यात आलं आहे. तर डीके शिवकुमार यांना उमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे. सरकार बनवण्यासाठीचा हा फॉर्म्युला दोन दिवसांपूर्वीच तयार करण्यात आला होता, पण त्यासाठी डीके शिवकुमार हे तयार नव्हते. त्यामुळे शेवटी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सूत्रे हातात घेतली आणि डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपद घ्यायला तयार झाले. त्यामुळे राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे नव्हे तर सोनिया गांधी हा तिढा सुटण्याला कारणीभूत आहेत.
कर्नाटकात काँग्रेसला सत्तेत आणण्यासाठी डीके शिवकुमार यांनी मोठी मेहनत घेतली, त्यांनी केलेल्या परिश्रमामुळेच काँग्रेस आज सत्तेत आली. त्यामुळे मुख्यमंत्रीपद आपल्यालाच मिळावं अशी त्यांची मागणी होती. त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते सिद्धारमय्या हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही होते. शेवटी हे पद सिद्धारमय्या यांच्या गळ्यात पडलं तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं.
मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर डीके शिवकुमार नाराज असल्याची चर्चा होती. डीके शिवकुमार यांची मनधरणी करण्यासाठी काँग्रेसला मोठा संघर्ष करावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीके शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास तयार नव्हते पण जड अंतःकरणाने त्यांनी ही ऑफर स्वीकारली. डीके यांचे मन वळवण्यात सोनिया गांधींचे सर्वात मोठे योगदान होते.
शिवकुमार यांना ही ऑफर देण्यात आली होती
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीसाठी आग्रही असलेले डीके शिवकुमार यांना महत्त्वाच्या सहा खात्यांसह उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती, जेणेकरून त्यांची छाप सरकारवरही पडेल. काम झाली नाही तर अर्धी टर्म संपल्यानंतर त्यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासनही देण्यात आल्याची चर्चा होती.
Reels
यानंतरही डीके शिवकुमार तयार होत नव्हते पण सोनिया गांधींच्या मध्यस्थीनंतर त्यांना हे मान्य करावे लागले. आपण गांधी कुटुंब आणि पक्षासाठी बलिदान दिले आहे असं डीके शिवकुमार यांनी म्हटल्याची सूत्रांनी माहिती दिली.
डीके शिवकुमार उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार नव्हते
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशी चर्चा करून सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री आणि डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री करावे अशी अंतिम शिफारस केली होती. परंतु डीके शिवकुमार यासाठी तयार नव्हते त्यामुळे अंतिम निर्णय जाहीर केला गेला नव्हता.
सोनिया यांनी सूत्रं हाती घेतली
डीके शिवकुमार यांना यासाठी काँग्रेस नेते वारंवार राजी करण्याचा प्रयत्न करत होती, पण ते तयार होत नव्हते. दुसरीकडे निर्णयाला झालेल्या दिरंगाईमुळे भाजपने काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत त्याला दुबळे म्हटले होते. त्यामुळे अखेर सोनिया गांधींना हस्तक्षेप करावा लागला आणि त्यांनी बुधवारी (17 मे) संध्याकाळी डीके शिवकुमार यांच्याशी चर्चा केली. सोनिया गांधींशी बोलल्यानंतर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास सहमती दर्शवली.
कर्नाटकात काँग्रेसची सरशी, तर भाजपचा दारुण पराभव
कर्नाटकातील विधानसभेच्या 224 जागांपैकी काँग्रेसनं 135 जागा जिंकल्या आहेत. तर भाजप 66 जागा आणि जेडीएस 19 जागांवर घसरले. 13 मे रोजी (शनिवारी) राज्यात निकाल लागला. तेव्हापासून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यापैकी कोण कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री होणार? हा प्रश्न कायम होता.
ही बातमी वाचा:
[ad_2]