CRICKETER SHUBMAN GILL LAUNCHES ‘SPIDER-MAN’ HINDI & PUNJABI TRAILERS

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CRICKETER SHUBMAN GILL LAUNCHES ‘SPIDER-MAN’ HINDI & PUNJABI TRAILERS : शुभमन गिल सध्या आयपीएलमध्ये वादळी फलंदाजी करत आहे. शुभमन गिल फलंदाजीमुळे चर्चेत आहेच.. पण आज तो वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. शुभमन गिल याने अॅनिमेशन चित्रपट स्पायडरमॅन एक्रॉस द स्पायडर वर्स या चित्रपटात आपला आवाज दिलाय.. शुभमन गिल याने स्पायडरमॅनच्या अॅनिमेशनला आपला आवाज दिलाय. 

शुभमन गिल याने आज अॅनिमेशन फिल्म ‘स्पायडरमॅन : अॅक्रॉस द स्पायडर-वर्स’ याच्या हिंदी आणि पंजाबी ट्रेलरला मुंबईमध्ये लाँट केलेय. विशेष म्हणजे, या चित्रपटात भारतीय स्पायडरमॅनमध्ये असणारे कॅरेक्टर ‘पवित्र प्रभाकरन’ याला शुभमन गिल याने आवाज दिलाय. हिंदी आणि पंजाबी चित्रपटाला शुभमन गिल याने आवाज दिलाय. चित्रपटाच्या डबिंग आणि ट्रेलर लाँचिंगवेळी गिल उत्साहात दिसत होता.  

ट्रेलर लाँच करताना शुभमन गिल याने आपण स्पायरडमॅनचे लहानपणापासूनच स्पायडरमॅनचा फॅन असल्याचे सांगितले. 2002 मध्ये स्पायडरमॅन चित्रपट पहिल्यांदा पाहिल्याचे ट्रेलर लाँचवेळी गिलने सांगितले. इतकेच नाही तर… सात आठ वर्षाचा असताना स्पायडरमॅनला पाहून प्रेरित होईन भीतींवर चढण्याचा प्रयत्न करत होतो, असे गिलने सांगितले…

पाहा ट्रेलर

 
यंदाच्या हंगामात शुभमन गिलचा धमाका – 

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात शुभमन गिल दमदार फॉर्मात आहे. शुभमन गिल याने वादळी शतक झळकावत अनेक विक्रमला गवसणी घातली होती. गुजरातकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजाच्या यादीत गिल पहिल्या क्रमांकावर आहे. शुभमन गिल याने 13 डावात 576 धावांचा पाऊस पाडलाय. शुभमन गिल याने यंदा एक शतक आणि चार अर्धशतके झळकावली आहेत. गिल याचा स्ट्राईक रेट 146 इतका राहिलाय तर सरासरी 48 आहे. यंदा शुभमन गिल याने 14 षटकार आणि 62 चौकार लगावलेत. शुभमन गिल सध्या गुजरात संघाकडून खेळत आहे. गेल्यावर्षी कोलकात्याने शुभमन गिल याला रिलिज केले होते. त्यानंतर गुजरात संघाने शुभमन गिल याला ताफ्यात घेतले होते. शुभमन गिल याने गुजरातसाठी दमदार फलंदाजी केली आहे. गुजरातच्या विजयात गिल याचा मोठा वाटा असतो. गुजरातचा पुढील सामना आरसीबीबरोबर होणार आहे. 

आणखी वाचा :

IPL 2023 : पृथ्वी शॉने मैदानातच घेतली ‘लेडी लक’ची भेट, मुलीने हार्ट इमोजी लावून केले अर्धशतकाचे कौतुक



[ad_2]

Related posts