Pune Drdo Honey Trap Case Forensic Report Received In This Report Mention Information Leakage

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Dr. Pradip Kurulkar : पाकिस्तानला देशाच्या संरक्षण क्षेत्रातील माहिती देणारे डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या तपासात महत्वाची माहिती हाती आली आहे. कुरुलकर प्रकरणात फॉरेन्सिक अहवाल तपास संस्थांना मिळाला आहे. याच अहवालात धक्कादायक माहिती समोर आली आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार कुरुलकर यांनी ईमेलद्वारे काही माहिती पाकिस्तानला दिल्याचे निष्पन्न झाले आहे. परदेशात माहिती देण्यासाठी कुरुलकर एका ईमेल आयडीचा करत होते. त्या ईमेलमधून देशातील गोपनीय माहिती कुरुलकर यांनी दिल्याचे स्षष्ट झाले आहे. त्यासोबतच ते डीआरडीओ येथील गेस्ट हाऊसमध्ये काही महिलांना देखील कुरुलकर भेटले होते. त्या महिला कोण आहेत? त्या कशासाठी आल्या होत्या, याची देखील चौकशी सुरु आहे.
 
15 मेपर्यंत कोठडी

एटीएस कोठडी संपल्याने आज कुरुलकरांना पुणे सत्र न्यायालयात हजर केलं होतं त्यांनी कोणती संवेदनशील माहिती शत्रूराष्ट्राला पुरवलीय याचा तपास करण्यासाठी त्यांची कोठडी वाढवून देण्याची मागणी एटीएसकडून करण्यात आली होती. न्यायालयाने ती मान्य करत कुरुलकर यांच्या कोठडीत 15 मेपर्यंत वाढ केली. याच दरम्यान त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीत धक्कादायक बाबी समोर येत आहे. प्रदीप कुरुलकर यांच्याकडील मोबाईल फोन, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह मधील डेटा त्यांनी डिलीट केला आहे. तो डेटा नक्की काय होता आणि तो त्यांनी पाकिस्तानी गुप्तचर विभागाला दिला आहे का?, याचा तपास करण्याची गरज असल्याचं एटीएसने न्यायालयात सांगितलं आहे.
 

प्रदीप कुरुलकर नेमके कोणते आरोप?

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं होतं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खाजगी पातळीवर पोहचला. या संवादादरम्यान डॉ. प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबरोबर भारतीय बनावटीच्या ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागण्यात आली. त्याचबरोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएसने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.

 

[ad_2]

Related posts