नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट बस स्टॉपवर आदळला अन्… 48 लोकांचा जागीच मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Kenya Accident : आफ्रिकन देश केनियामध्ये (Kenya) एक भीषण रस्ते अपघात झाला आहे. शुक्रवारी एका कंटेनरने (contener) रस्त्यावरुन जाणारी माणसे आणि वाहने चिरडल्याने हा भीषण अपघात झालाय. या अपघातात 48 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. त्याचबरोबर या अपघातात अनेक जण जखमीही झाले असून, यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री मृतांची संख्या 48 होती. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शकत्या पोलिसांनी वर्तवली आहे.

शुक्रवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात कंटनरने चिरडल्याने 48 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मुख्य बाजारपेठेच्या गजबजलेल्या परिसरात घडली आहे. रात्रीच्यावेळी शेकडो लोक तेथे जमले होते. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनियंत्रित कंटनरने एकामागून एक इतर अनेक वाहनांना धडक दिली आणि त्यातच बाजारात असलेले लोक चिरडले गेले. हा अपघात एवढा भीषण होता की, अनेक कार आणि बाईकचा अक्षरक्षः चुराडा झाला. कारमधील प्रवाशांचे छिन्नविछिन्न झालेले मृतदेह कारच्या आतच गाडले गेले.

सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लोंडियानी जंक्शन येथे हा अपघात झाला. अपघातानंतर रस्त्यावर अनेक गाड्या त्यातील माणसांसह चिरडल्या गेल्या होता. तर कंटेनर एका बाजूला पडलेला होता. कंटेनरच्या खालीसुद्धा जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य सुरु करण्यात आले होते.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कंटेनर वेगात होता आणि मोठा आवाज करत पुढे जात होता. मी फक्त एवढेच म्हणू शकते की मी जिवंत आहे हे माझं भाग्य आहे. कारण मी जे पाहिले ते अतिशय वाईट होते. अपघाताच्या ठिकाणी फक्त मृतदेह आणि रक्त होते. बरेच लोक मरण पावले आहेत. अपघात अचानक झाल्याने लोकांना पळायला सुद्धा मिळाले नाही. अपघातानंतर सर्वजण फक्त धावत होते.

दरम्यान, मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडथळे येत असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. केरिचोच्या दिशेने जात असलेल्या कंटनरचे नियंत्रण सुटले आणि तो बस स्टॉपवर खचाखच भरलेल्या मिनीबसला धडकला. यासोबत कंटेनरने बस स्टॉपजवळ उभ्या असलेल्या प्रवाशांना देखील चिरडले.

Related posts