पाकिस्तानचं नवं नाटक! PCB भारतात त्यांचं सुरक्षा पथक पाठवणार आणि मगच वर्ल्डकप खेळण्याचा निर्णय

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली: यंदाचा वनडे वर्ल्डकप २०२३ भारताच्या यजमानपदाखाली भारतात खेळवला जाणार आहे. यासाठी ICC कडून वेळापत्रकडॆहील जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीने जाहीर केलेल्या वनडे वर्ल्डकप २०२३ च्या वेळापत्रकावर आपली अधिकृत भूमिका मांडली आहे. पीसीबीच्या प्रवक्त्याने पुन्हा एकदा सांगितले की या स्पर्धेत संघाचा सहभाग सरकारच्या मान्यतेवर अवलंबून आहे. पण पाकिस्तानमधून एक वेगळीच माहिती समोर येत आहे. मात्र, एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, पीसीबी पाकिस्तानचे सामने खेळणार असलेल्या ठिकाणी सुरक्षा पथक पाठवण्याची तयारी करत आहे.

पीसीबीने आता वर्ल्डकपसाठीचे नवे नाटक सुरु केले आहे. आता पाकिस्तानचा संघ एका सुरक्षा पथक भारतात पाठवणार आहे. जिथे जिथे पाकिस्तानचे सामने होणार आहेत तिथे हे सुरक्षेच्या दृष्टीने हे पथक पाहणी करेल. पाकिस्तानचा संघ वर्ल्डकपमध्ये अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद या ठिकाणी खेळणार आहे.

पीसीबीच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, “बोर्डाला सामन्यांच्या ठिकाणांसह भारताच्या कोणत्याही दौऱ्यासाठी पाकिस्तान सरकारची परवानगी आवश्यक आहे. आम्ही मार्गदर्शनासाठी आमच्या सरकारशी संपर्क साधत आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडून माहिती मिळताच ICC लाअपडेट करू.”

अयोध्येतील काकांचे क्रिकेट प्रेम, कुटुंबाला व्हिडिओ कॉलवर दाखवली भारतीय संघाची नेट प्रॅक्टीस

याशिवाय ज्या ठिकाणी पाकिस्तान क्रिकेट संघाचे सामने होणार आहेत, त्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था तपासण्यासाठी PCB आपले सुरक्षा पथक पाठवण्याच्या तयारीत आहे. या प्रक्रियेसाठी कोणतीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही आणि ती सरकारच्या प्रतिसादावर अवलंबून असेल. काही संघांनी मोठ्या कार्यक्रमांपूर्वी असे सुरक्षा मूल्यमापन करणे हा एक सराव आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा पथकाच्या अहवालामुळे भारताविरुद्धचा २०१६ चा टी-२० वर्ल्डकप सामना धर्मशाला येथून कोलकात्यात खेळवावा लागला होता.

[ad_2]

Related posts