Rain Saves West Indies From Big Blow Of Out Of ODI World Cup ; चार वर्षांपूर्वीही वेस्ट इंडिज वर्ल्डकपमधून आऊट होणार होता

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : वेस्ट इंडिजच्या संघाला आता ओक मोठा धक्का बसला आहे. कारण ते भारतामधील वनडे विश्वचषकात खेळू शकणार नाही. पण चार वर्षांपूर्वीही वेस्ट इंडिजला असाच एक मोठा धक्का बसणार होता. त्यावेळी त्यांना वाचवले गेले होते. वेस्ट इंडिजला त्यावेळी कोणी वाचवले होते आणि नेमकं काय घडलं होतंं, याची सर्व माहिती आता समोर आली आहे.

यावेळी स्कॉटलंडसारख्या संघाने वेस्ट इंडिजला पराभूत केले आणि ते विश्वचषकाच्या शर्यतीमधून बाहेर फेकले गेले. पण चार वर्षांपूर्वीही स्कॉटलंडचा संघच त्यांच्या मार्गात आडवा आला होता. हा सामना आयर्लंड जिंकेल आणि वेस्ट इंडिजला धुळ चारेल, असे वाटले होते. हा सामना गमावल्यावर वेस्ट इंडिजचे विश्वचषकात खेळता येणार नव्हते. पण त्यावेळी अशी एक गोष्ट घडली की त्यामुळे वेस्ट इंडिजच्या संघाला धक्का बसला नाही.

चार वर्षांपूर्वी विश्वचषकाची पात्रता फेरी सुरु होती. त्यावेळी वेस्ट इंडिजसाठी करो या मरो सामना हा स्कॉटलंडबरोबरच होता. या सामन्यात वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी होती. त्यावेळी इव्हिन लुईस आणि मार्लोन सॅम्युअल्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर वेस्ट इंडिजने १९८ धावांची मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना स्कॉटलंडने दमदार सुरुवात केली होती. स्कॉटलंडची त्यावेळी ५ बाद १२५ अशी स्थिती होती आणि त्यांना विजयासाठी ७३ धावा हव्या होत्या. या ७३ धावा करण्यासाठी त्यांच्याकडे जवळपास १५ षटके होती. स्कॉटलंडची सहाव्या विकेटसाठी चांगली भागीदारी झाली होती. त्यामुळे स्कॉटलंड हा सामना सहज जिंकेल, असे वाटत होते. पण त्यावेळी एक अशी गोष्ट घडली की त्यामुळे सर्वच गणित बिघडले. कारण त्यानंतर पाऊस आला आणि सामना थांबण्यात आला. पावसाचा जोर जास्त असल्यामुळे डकवर्थ लुईस नियमांनुसार यावेळी वेस्ट इंडिजला फक्त पाच धावांनी विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांना विश्वचषकासाठी पात्र ठरता आले.

पाकिस्तानी नेट गोलंदाजाच्या खेळाने विराट कोहली भलताच इम्प्रेस

चार वर्षांपूर्वीच वेस्ट इंडिजला स्कॉटलंडचा संघ धक्का देणार होता, पण त्यावेळी मात्र ही अशी गोष्ट घडली की त्यामुळे सर्व काही समीकरण बिघडले.

[ad_2]

Related posts