How Fennel Seeds And Rock Sugar Given After Meals 5 Health Benefits; जेवल्यानंतर का खावी बडिशेप खडीसाखर, ५ आरोग्यदायी फायदे

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी

पचनक्रिया मजबूत करण्यासाठी

बडिशेप आणि खडीसारखेच्या मिश्रणाचे सेवन केल्याने पचनक्रिया अधिक मजबूत होते. बडिशेपेमध्ये असणारे विटामिन्स, फायबर, कॅल्शियम यासह अनेक पोषक तत्व असतात. तसंच यामध्ये अनेक औषधीय गुण आढळतात. जेवण जेवल्यानंतर बडिशेप खडीसाखर खाल्ल्याने अन्नाचे पचन लवकर होण्यास मदत मिळते आणि पोटासाठी याचा फायदा होतो असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

हिमोग्लोबिन राहाते योग्य

हिमोग्लोबिन राहाते योग्य

बडिशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने शरीरामध्ये रक्ताची कमतरता भासत नाही. याच्या सेवनाने हिमोग्लोबिनचा स्तर योग्य राहातो. तुम्हाला रक्ताची कमतरता भासत असेल तर रक्तप्रवाह योग्य करण्यासाठी बडिशेप-खडीसाखरेचे मिश्रण नियमित खावे.

(वाचा – सकाळीच उपाशीपोटी प्या या काळ्या दाण्याचे पाणी, पोट होईल साफ आणि मिळतील ७ जबरदस्त फायदे)

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी

बडिशेप आणि खडीसाखर मिश्रणाने प्रतिकारशक्ती शरीरामध्ये वाढण्यास मदत मिळते. शरीरातील रोगप्रतिरोधक क्षमता वाढविण्यास याचा फायदा मिळतो. बडिशेपमध्ये विटामिन आढळत असून प्रतिकारशक्ती वाढविण्यास याची मदत मिळते.

(वाचा – गव्हाचे नाही तर वजन कमी करण्यासाठी हे पीठ ठरते अधिक उपयुक्त, महिनाभरात होईल झर्रकन Weight Loss)

आळस दूर करण्यासाठी

आळस दूर करण्यासाठी

दुपारी अथवा रात्री जेवल्यानंतर अनेक व्यक्तींना आळस येतो. तसंच झोपावंसं वाटू लागतं. त्यामुळे जेवल्यानंतर त्वरीत बडिशेप आणि खडीसाखर सेवन केल्याने फ्रेश वाटते आणि आळस दूर होण्यास मदत मिळते.

(वाचा – युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली आहे कसे समजेल? काय कराल सोपा उपाय)

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी

जेवल्यानंतर जर तोंड व्यवस्थित धुतले नाही अथवा तुम्ही दाताची स्वच्छता नीट राखत नसाल तर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. ही तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी बडिशेप आणि खडीसाखरेच्या मिश्रणाचा उत्तम पर्याय निवडता येतो. हे माऊथ फ्रेशनरप्रमाणे काम करते आणि तोंडाच्या दुर्गंधीपासून त्वरीत सुटका मिळवून देते.

[ad_2]

Related posts