West Indies Are Out From The World Cup 2023 In India ; दोन विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिजला मोठा धक्का

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : क्रिकेट विश्वाला सध्याच्या घडीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कारण पहिले दोन वनडे विश्वचषक जिंकणार वेस्ट इंडिजचा संघ आता ODI World Cup 2023 मधून बाहेर पडला आहे. विश्वचषकाच्या पात्रता फेरीत वेस्ट इंडिजचा स्कॉटलंड पराभव केला आणि त्यामुळे भारतातील विश्वचषकात खेळण्याचे त्यांचे स्वप्न आता धुळीस मिळाले आहे. वेस्ट इंडिजच्या संघावर ही नामुष्की पहिल्यांदच ओढवली आहे.

भारतीय संघ आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. पण वेस्ट इंडिजचा संघ मात्र आता भारतामधील विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण सध्याच्या घडीला विश्वचषकासाठी पात्रता फेरी सुरु आहे. या फेरीत वेस्ट इंडिजला यापूर्वी झिम्बाम्वेच्या संघाने मोठा धक्का दिला होता. पण आता तर क्रिकेट विश्वात लिंबू-टिंबू समजल्या जाणाऱ्या स्कॉटलंडने वेस्ट इंडिजला पराभूत केले आहे आणि या पराभवानंतर ते आता भारतामधील होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळू शकणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

वेस्ट इंडिजने १९७५ साली झालेल्या पहिल्या विश्वचषकात बाजी मारली होती. त्यानंतर १९७९ साली झालेल्या दुसऱ्या विश्वचषकातही त्यांनी जेतेपद पटकावले होते. त्यानंतर त्यांना विश्वविजयाची हॅट्रीक साधण्याची चांगली संधी होती. पण १९८३ साली झालेल्या विश्वचषकात भारताने त्यांचा अंतिम फेरीत पराभव केला आणि त्यांची ही हॅट्रीक पूर्ण होऊ शकली नाही. त्यानंतर मात्र वेस्ट इंडिजच्या संघाला आतापर्यंत एकही विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे या विश्वचषकात त्यांची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण आता तर त्यांना भारतामधील विश्वचषकातच खेळता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

स्कॉटलंडच्या या सामन्यात वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी होती. या सामन्यात वेस्ट इंडिजची सुरुवात चांगली झाली नाही. कारण त्यांचा अर्धा संघ फक्त ६० धावांत गारद झाला होता. पण त्यानंतर जेसन होल्डरने ४५ धावांची खेळी साकारली आणि त्यामुळेच त्यांना १८१ धावांपर्यंत मजल मारता आली. पण त्यानंतर स्कॉटलंडने मात्र साह विकेट्स राखत हा सामना सहजपणे जिंकला आणि त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ हा भारतातील विश्वचषकात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

[ad_2]

Related posts